AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor | रणबीर कपूरने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये न्यूयॉर्कमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला!

'ए दिल है मुश्किल'च्या प्रमोशनसाठी तिथे आलेल्या रणबीरने कपिलला सांगितले की, "मी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर चालत होतो. मला फास्ट बाथरूममध्ये जायचे होते, यासाठी मी हॉटेलच्या दिशेने धावत होतो. पण मला अचानत तिथे हॉलिवूड स्टार नताली पोर्टमॅन दिसली मग मी सेल्फी घेण्यासाठी त्यांच्या जवळ गेलो.

Ranbir Kapoor | रणबीर कपूरने 'द कपिल शर्मा शो' मध्ये न्यूयॉर्कमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला!
| Updated on: Jul 24, 2022 | 9:44 AM
Share

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) स्टार रणबीर कपूर त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे खूप चाहते आहेत. पण तरीही अनेकदा असे घडते की लोकप्रिय सेलिब्रिटींना ओळखतही नाहीत. हॉलिवूडमध्ये जास्त करून शाहरुख, सलमान किंवा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांसारख्या काही मोठ्या बॉलिवूडमधील कलाकारांना ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये रणबीरसोबत असेच घडले होते. 2016 मध्ये रणबीरसोबत घडलेला किस्सा त्याने स्वत: ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला आहे. रणबीरने हॉलिवूड स्टार (Hollywood star) नताली पोर्टमॅनला एका सेल्फीसाठी विनंती केली होती, मात्र, तिने रणबीरला कशाप्रकारे हाकलून दिले हे त्यांने सांगितले आहे.

रणबीरने सांगितला न्यूयॉर्कमध्ये घडलेला किस्सा

‘ए दिल है मुश्किल’च्या प्रमोशनसाठी तिथे आलेल्या रणबीरने कपिलला सांगितले की, “मी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर चालत होतो. मला फास्ट बाथरूममध्ये जायचे होते, यासाठी मी हॉटेलच्या दिशेने धावत होतो. पण मला अचानत तिथे हॉलिवूड स्टार नताली पोर्टमॅन दिसली मग मी सेल्फी घेण्यासाठी जवळ गेलो. मात्र, यादरम्यान मी बघितले नव्हते की, नताली रडत होती. मी फोटो फोटो तिला म्हणत असताना तिने माझ्याकडे रागाने बघितले आणि मला तिथून निघून जायला सांगितले. रणबीर पुढे म्हणाला की, या घटनेनंतर माझे हृदय तुटले पण तरीही मी त्या अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता आहे.

रणबीरला तिथून हाकलून देण्यात आले

रणबीर कपूरचा नुकताच ‘शमशेरा’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला लोक आणि समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत आणि चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी काही खास कमाई झाली नाहीयं. एवढी मोठी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट काही विशेष करू शकलेला नाही. रणबीर कपूरच्या 2018 मध्ये आलेल्या संजू चित्रपटाच्या कमाईच्या तुलनेत हे काहीच नाही. पहिल्या दिवशी बाॅक्स आॅफिसवर रणबीर कपूरचा चित्रपट शमशेरा काही तरी खास करेल अशी अनेकांना अपेक्षा होती.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...