83 Trailer | कपिल देव बनून रणवीर सिंह जिंकतोय प्रेक्षकांची मने! पाहा ‘83’चा जबरदस्त ट्रेलर…

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) बहुप्रतीक्षित चित्रपट ‘83’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

83 Trailer | कपिल देव बनून रणवीर सिंह जिंकतोय प्रेक्षकांची मने! पाहा ‘83’चा जबरदस्त ट्रेलर...
83 the film
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 1:07 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) बहुप्रतीक्षित चित्रपट ‘83’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. चाहते या चित्रपटाच्या रिलीजची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. ट्रेलरची सुरुवात भारतीय संघाच्या खेळाने होते. भारतीय संघातील खेळाडू एक एक करून बाद होत आहेत आणि संपूर्ण संघाला कपिल देव यांच्याकडून अपेक्षा आहेत.

जेव्हा भारतीय संघ 1983 चा विश्वचषक खेळायला जातो, तेव्हा रणवीर कपिल देव यांच्या रुपात उभा राहतो आणि कॉन्फरन्समध्ये म्हणतो की, मी येथे जिंकण्यासाठी आलो आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी तत्कालीन भारतीय संघाचे व्यवस्थापक पीआर मान सिंह यांची भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमध्ये ते कपिलला म्हणतात की, ’35 वर्षांपूर्वी आम्ही स्वातंत्र्य मिळवले, पण आम्हाला अजूनही सन्मान मिळवायचा आहे, कॅप्टन.’

भारतीय संघाचा संघर्ष मोठ्या पडद्यावर

ट्रेलरच्या पहिल्या भागात भारतीय संघ संघर्ष करताना दिसत होता, तर दुसऱ्या भागात संघाने शानदार पुनरागमन करत विजय मिळवताना दिसला. मात्र, विजयापूर्वी भारतीय संघ आणि त्यांच्या कुटुंबियांना सहन कराव्या लागलेल्या दु:खाचा आणि संघर्षाचा सामना खूपच भावनिक आहे.

पाहा ट्रेलर :

ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण दिसली, जी चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटात हार्डी संधूने मदन लालची भूमिका, एमी विर्कने बलविंदर सिंग संधूची, तर साकिब सलीमने मोहिंदर अमरनाथची भूमिका केली आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला भारतीय क्रिकेट संघावर भारताला विजय मिळवून देण्यासाठीचा दबाव देखील जाणवेल.

अनेक भाषेत प्रदर्शित होणार चित्रपट!

कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट आधी गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे रिलीज पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट यावर्षी 24 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कमल हसन राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि नागार्जुन अक्किनेनी अन्नपूर्णा स्टुडिओ रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने तामिळ आणि तेलगू आवृत्ती आणली जाणार आहेत. पृथ्वीराज प्रॉडक्शन आणि किच्चा सुदीप शालिनी आर्ट्स या चित्रपटाची मल्याळम आणि कन्नड आवृत्ती प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.