पहिली पत्नी पतीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करताच रवीना टंडनने फेकला होता ज्यूसचा ग्लास, वाचा किस्सा…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 28, 2021 | 7:56 AM

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे. 1991 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रवीना टंडनने 'मोहरा', 'दिलवाले', अंदाज अपना-अपना 'दुल्हे राजा' सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

पहिली पत्नी पतीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करताच रवीना टंडनने फेकला होता ज्यूसचा ग्लास, वाचा किस्सा...
Raveena Tondon

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे. 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रवीना टंडनने ‘मोहरा’, ‘दिलवाले’, अंदाज अपना-अपना ‘दुल्हे राजा’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. अक्षय कुमारसोबत त्याच्या 1994 मधील ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप-टिप बरसा पानी’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले आणि चाहत्यांना आजही हे गाणे आजही तितकेच आवडते. या गाण्यात तिची हॉट स्टाईल चांगलीच पसंत केली गेली होती. या काळात ती अक्षय कुमारच्याही जवळ आली. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

दोघांचे अफेअर सुमारे तीन वर्षे चालले आणि त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अक्षयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रवीना डिप्रेशनमध्ये गेली. यानंतर, ‘स्टम्प्ड’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, तिची भेट व्यावसायिक अनिल थडानीशी झाली. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 2003 मध्ये रवीना टंडनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनिलने तिला लग्नासाठी प्रपोज केले आणि रवीनाने ‘हो’ म्हटले. यानंतर, नोव्हेंबर 2003मध्ये दोघांचे लग्न झाले.

मित्राच्या पार्टीत जमले होते…

अनिल थडानीचे पहिले लग्न नताशासोबत झाले होते. एकदा एका पार्टी दरम्यान, रवीना टंडन तिच्यावार्व रागावली आणि तिने थडनीच्या माजी पत्नीवर ज्यूसचा ग्लास फेकला होता. ही घटना एका नववर्षाच्या पार्टीची होती. रितेश सिधवानीने काही वर्षांपूर्वी नवीन वर्षाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन केले होते. रवीना टंडनचा पती अनिल थडानीसोबतच त्याची माजी पत्नीही या पार्टीला हजर होती.

… आणि रवीनाने ग्लास फेकून मारला!

अनिल थडानीची माजी पत्नी नताशा सिप्पी पार्टीमध्ये सतत त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. रवीना टंडन हे सर्व शांतपणे पाहत होती. जेव्हा तिला नताशा पती अनिल थडानीच्या खूप जवळ येणे आवडले नाही, तेव्हा तिला तिचा राग देखील सहन झाला नाही आणि रागाने तिने ज्यूसने भरलेला ग्लास नताशावर फेकला.

रवीना टंडन नंतर या घटनेवर म्हणाली की, जर कोणी तिच्या पतीचा किंवा कुटुंबाचा अपमान करेल, तर ती त्याला सोडणार नाही. त्याचवेळी नताशा सिप्पीने सांगितले की, रवीना पार्टीमध्ये अनिलशी बोलले म्हणून उगाचच असुरक्षित वाटून घेत होती. तिने म्हटले होते की, रवीनाने तिच्यावर ज्यूसचा ग्लास इतक्या जोराने फेकला की, तिचे बोट कापले गेले.

तिला माझा हेवा वाटत होता!

या घटनेवर आपली बाजू मांडताना नताशा म्हणाली की, रवीनाला तिचा हेवा वाटतो. तिने सांगितले होते, मी मित्रांसोबत रितेश सिधवानीच्या घरी नवीन वर्षाच्या पार्टीला गेले होते. मला अनिल आणि रवीनाचीही पर्वा नव्हती आणि मी माझे काम करत होतो. मी रितेशच्या चुलतभावासोबत होतो. तिथे सोफ्याचे फक्त दोन संच होते, त्यापैकी एकावर मी बसण्याचा निर्णय घेतला. आता, जर मी तिच्या नवऱ्याच्या पाच फूट जवळ बसले, तर रवीनाला इतके असुरक्षित वाटण्यासारखे काय होते आणि यात मी काय करू?

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | एकटं फिरण्यावरही बंधन येणार, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जोडी की बेडी’चा नवा खेळ रंगणार!

Milind Soman | तब्बल 26 वर्षानंतर मिलिंद सोमण पुन्हा रॅम्प अवतरला, अभिनेत्याच्या लूक पाहून मलायका झाली अवाक्!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI