God Father Teaser: चिरंजीवीच्या ‘गॉड फादर’मध्ये सलमानची जबरदस्त एण्ट्री; भाईजानसोबत मेगास्टारही ॲक्शन मोडमध्ये

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 22, 2022 | 10:28 AM

दिग्दर्शक मोहन राजा दिग्दर्शित 'गॉडफादर' हा एक राजकीय ॲक्शनपट आहे. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या लुसिफर चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाद्वारे सलमान खान तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

God Father Teaser: चिरंजीवीच्या 'गॉड फादर'मध्ये सलमानची जबरदस्त एण्ट्री; भाईजानसोबत मेगास्टारही ॲक्शन मोडमध्ये
God Father Teaser: चिरंजीवीच्या 'गॉड फादर'मध्ये सलमानची जबरदस्त एण्ट्री
Image Credit source: Youtube

बॉलिवूडपाठोपाठ आता अभिनेता सलमान खान (Salman Khan) दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झाला आहे. मेगास्टार चिरंजीवीचा (Chiranjeevi) नुकताच प्रदर्शित झालेला ‘गॉड फादर’ (Godfather) या चित्रपटाच्या टीझरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चिरंजीवीच्या आगामी चित्रपटात सलमान खान ॲक्शन अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान एक खास व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यामुळे बॉलिवूडचा भाईजान आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची छाप सोडणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचा टीझर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सातत्याने नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता दोन्ही कलाकारांना एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह आहे. या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा साकारत आहे.

टीझरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटात नयनताराचं पात्र गॉडफादरच्या विरोधात दाखवण्यात आलं आहे. गॉडफादर परत यावा अशी तिची इच्छा नाही. त्याचवेळी क्लिपमध्ये सलमानला बाइकवर स्टंट करताना पहायला मिळत आहे. सलमानची ही स्टाईल पाहून प्रेक्षक चित्रपटाविषयी उत्सुक झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

चित्रपटात सलमानचा कॅमिओ

या चित्रपटात सलमान खान एका खास भूमिकेत आहे. त्याचवेळी चिरंजीवी आणि नयनतारा एकमेकांच्या विरोधात दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे सलमान खान पहिल्यांदाच साऊथ चित्रपटसृष्टीत उतरणार आहे. अशा परिस्थितीत सलमानची कॅमिओ भूमिका चित्रपटाच्या कथेत काय वळण आणते हे पाहणं रंजक ठरेल.

दसऱ्याला प्रदर्शित होणार ‘गॉडफादर’

दिग्दर्शक मोहन राजा दिग्दर्शित ‘गॉडफादर’ हा एक राजकीय ॲक्शनपट आहे. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या लुसिफर चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाद्वारे सलमान खान तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल सांगितले जात आहे की हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच दसऱ्याला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड आणि टॉलिवूडचे मोठे कलाकार पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI