‘मी घरी आलोय पण आता ती रुग्णालयात दाखल’, सतीश कौशिकना सतावतेय लेकीची चिंता!

काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते सतीश कौशिक (Satish kaushik) यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता सतीश कौशिक ठीक असून, ते दवाखान्यातून घरी परतले आहेत.

‘मी घरी आलोय पण आता ती रुग्णालयात दाखल’, सतीश कौशिकना सतावतेय लेकीची चिंता!
सतीश कौशिक
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 6:52 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते सतीश कौशिक (Satish kaushik) यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता सतीश कौशिक ठीक असून, ते दवाखान्यातून घरी परतले आहेत. पण, सतीश कौशिश सध्या खूप चिंतेत आहेत. कारण, त्यांच्या चिमुकल्या मुलीलाही कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे आता तिला देखील रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. सतीश कौशिकच्या मुलीचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु तिची प्रकृती खराब असल्याचे म्हटले जात आहे (Satish kaushik daughter Vanshika Hospitalized due to high fever).

बॉलिवूडच्या हंगामाच्या अहवालानुसार सतीश कौशिक म्हणाले की, ‘मी आता बरा होत आहे आणि काही दिवस घरीच क्वारंटाईन राहणार आहे. परंतु, माझी मुलगी वंशिका गेल्या पाच दिवसांपासून रूग्णालयात आहे. तिचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे. परंतु, तिचा ताप अद्याप कमी झालेला नाही. कृपया, तुम्ही सगळे तिच्यासाठी देखील प्रार्थना करा’, अशी विनंती देखील त्यांनी चाहत्यांना केली आहे. सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका ही वयाने खूपच लहान आहे.

रिपोर्ट निगेटिव्ह पण ताप जास्त!

लहान मुलांमध्येही कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कारण, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी व्यक्तीपेक्षा आणि मोठ्यांपेक्षा फार कमी असते. यावर बोलताना सतीश कौशिश म्हणाले की, ‘मुलांची इम्यून सिस्टम हा एक मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोनाबद्दल अद्याप कोणतीही खात्री नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे वंशिकाचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे, परंतु ती अजूनही आजारी आहे. तिचा ताप 100 ते 101च्या दरम्यान कायम आहे. फोनवर तिचा रडण्याचा आवाज ऐकून माझ्या हृदयाचे पाणी-पाणी झाले आहे. या कठीण काळात देव आपल्या सर्वांच्या मुलांना निरोगी ठेवो.’(Satish kaushik daughter Vanshika Hospitalized due to high fever)

महाराष्ट्रात वाढतायत कोरोनाचे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. चित्रपट आणि टीव्ही कलाकार देखील एकामागून एक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. सतीश कौशिकशिवाय अभिनेता रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, अभिनेत्री तारा सुतारिया, निर्माते संजय लीला भन्साळी, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यासारखे अनेक कलाकार कोरोना विषाणूला बळी पडले आहेत.

महाराष्ट्र सरकार सतत कोरोना नियमांनुसार फिल्म आणि टीव्ही कलाकारांना शूटिंग करण्याचा आग्रह धरत आहे. पण, सध्या कोरोना संसर्गाची बरीच प्रकरणे पाहिल्यानंतर असे दिसते की, शूटिंगदरम्यान निष्काळजीपणाने काम सुरु आहे. याचा दरम्यान, अभिनेत्री गौहर खानवरही बीएमसीने कारवाई केली होती, कारण तिने कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते.

(Satish kaushik daughter Vanshika Hospitalized due to high fever)

हेही वाचा :

Jagdeep Birth Anniversary | विनोदी भूमिकाच नाही तर खलनायक म्हणूनही लक्षात राहिलेला अभिनेता! वाचा अभिनेते जगदीप यांच्याबद्दल…

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.