Jagdeep Birth Anniversary | विनोदी भूमिकाच नाही तर खलनायक म्हणूनही लक्षात राहिलेला अभिनेता! वाचा अभिनेते जगदीप यांच्याबद्दल…

मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्यदेखील चित्रपटाच्या कथेप्रमाणेच होते. जगदीप यांचे 3 विवाह झाले होते. तर, स्वतःपेक्षा 33 वर्ष लहान जोडीदार निवडल्याने त्यांच्यावर खूप टीकाही झाली होती.

Jagdeep Birth Anniversary | विनोदी भूमिकाच नाही तर खलनायक म्हणूनही लक्षात राहिलेला अभिनेता! वाचा अभिनेते जगदीप यांच्याबद्दल...
जगदीप
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 4:19 PM

मुंबई : चाळीस-पन्नासच्या दशकात अभिनयाच्या वेडाने झपाटलेले अनेक कलाकार स्वप्ननगरी मुंबईत दाखल झाले. मात्र याच काळात अपघाताने, ओघाओघानेच या चंदेरी दुनियेत प्रवेश केलेल्या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या कलाकारांनापैकीच एक म्हणजे अभिनेते जगदीप (Actor Jagdeep). आपल्या विनोदी अभिनय शैलीने त्यांनी सगळ्यांना हसवलेच, पण त्यांच्या नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या (Soorma Bhopali Aka Actor Jagdeep Birth Anniversary special story know about actors life).

स्वातंत्र्यपूर्व काळात 29 मार्च 1939 रोजी मध्यप्रदेशातील दतियामध्ये जगदीप यांचा जन्म झाला. जगदीप यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक जाफरी! त्यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला होता. जगदीप यांचे वडील बॅरिस्टर होते. 1947च्या फाळणी दरम्यान त्यांनी त्यांच्या कुटुंबाने भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र याच वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. एकेकाळी सधन असणाऱ्या जगदीप यांच्या कुटुंबाची एकवेळच्या जेवणाचीदेखील आबाळ झाली होती. वडिलांच्या जाण्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले होते. नोकरीच्या शोधात त्यांच्या आईने जगदीप आणि त्यांच्या भावडांना घेऊन मुंबई गाठली. पोटापाण्यासाठी त्यांच्या आईने मुंबईतील एका अनाथआश्रमात स्वयंपाकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आपल्या आईची होणारी दगदग पाहून लहानग्या जगदीप यांना रडू येई. आईला मदत व्हावी म्हणून त्यांनी शाळेला रामराम ठोकत, रस्त्यावर साबण, फणी, पतंग विकण्यास सुरुवात केली. ‘जिवंत राहण्यासाठी काम तर करायचे होतेच, पण कुठलेही चुकीचे काम करून जगायचे नव्हते’, असे ते नेहमी म्हणत.

बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात!

असच एक दिवशी रस्त्यावर सामान विकत असताना त्यांच्याजवळ एक व्यक्ती आला आणि त्यांना चित्रपटात काम करशील का असे विचारले. चित्रपट कधीच न पाहिलेल्या जगदीपने त्यांना ‘चित्रपट म्हणजे काय?’ असा प्रश्न केला. त्या व्यक्तीने त्यांना थोडक्यात अभिनय कसा करतात ते समजावले. अभिनयाचे तीन रुपये मिळतील हे ऐकल्यावर ते काम करण्यास लगेच तयार झाले. बी.आर. चोप्रांच्या ‘अफसाना’ या चित्रपटातील एका दृश्यासाठी बालकलाकाराची गरज होती. त्यासाठी जगदीप यांची निवड झाली होती. त्यांना लहान मुलांच्या घोळक्यात बसायचे होते.

याच दृश्यात एका मुलाला उर्दूत संवाद म्हणायचा होता. मात्र काही केल्या त्याला तो उच्चारता येईना. बाजूला बसलेल्या जगदीप यांनी त्याला, ‘मी म्हंटला तर मला काय मिळेल?’, असा भाबडा प्रश्न केला. त्यावर माझे ३ रुपयेही तुला मिळतील असे उत्तर मिळाल्यावर जगदीप यांनी तो संवाद एका दमात म्हणून टाकला. अशाप्रकारे त्यांचे या चंदेरी दुनियेत पदार्पण झाले. त्यांनतर बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांत काम केले. बिमल राय यांच्या ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. जॉनी वॉकर, मेहमूद यांच्यासोबत जगदीप यांचे नावही येऊ लागले (Soorma Bhopali Aka Actor Jagdeep Birth Anniversary special story know about actors life).

विनोदी भूमिकाच नाही तर खलनायक म्हणूनही लक्षात राहिले!

1957मध्ये प्रदर्शित झालेल्या पी.एल. संतोषी दिग्दर्शित ‘हम पंछी एक डाल में’ या चित्रपटातील जगदीप यांनी साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील जगदीप यांचे विशेष कौतुक केले होते. ‘ब्रह्मचारी’, ‘अनमोल मोती’, ‘दो भाई’, ‘इश्क पर जोर नही’ सारख्या चित्रपटांतून त्यांच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या. विनोदी भूमिकांबरोबरच रामसे ब्रदर्सच्या ‘पुराना मंदिर’, ‘एक मासूम’, ‘मंदिर मस्जिद’ या भयपटांतील त्यांच्या नकारात्मक भूमिकादेखील तितक्याच गाजल्या.

‘सूरमा भोपाली’ अजरामर!

1975मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हा चित्रपट जगदीप यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात जगदीप यांनी ‘सूरमा भोपाली’ हे पात्र साकारले होते. या भूमिकेने जगदीप यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. या व्यक्तिरेखेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून त्यांनी ‘सुरमा भोपाली’ नावाचा चीत्र्पाठी तयार केला होता. त्यानंतर 1994मध्ये ‘अंदाज अपना अपना’ या गाजलेल्या चित्रपटातही जगदीप यांनी भूमिका साकारली होती.

वैयक्तिक आयुष्यही चर्चेत!

मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्यदेखील चित्रपटाच्या कथेप्रमाणेच होते. जगदीप यांचे 3 विवाह झाले होते. तर, स्वतःपेक्षा 33 वर्ष लहान जोडीदार निवडल्याने त्यांच्यावर खूप टीकाही झाली होती. त्यांना 6 अपत्ये असून, त्यापैकी जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे सध्या चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. त्यांची मुलगी मुस्कानदेखील वडिलांच्या पावलावर पऊल ठेवत लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. जगदीप यांनी 50 वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास 400हून अधिक चित्रपटांतून काम केले. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल 2019मध्ये त्यांना ‘आयफा जीवन गौरव’पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

(Soorma Bhopali Aka Actor Jagdeep Birth Anniversary special story know about actors life)

हेही वाचा :

Video | प्रभासच्या ताफ्यात भारदस्त Lamborghini, बाहुबलीच्या कारची किंमत….

Fact Check | दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य…

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.