Shah Rukh Khan: “त्या एका व्यक्तीसमोर त्यांनाही झुकावं लागतं”; शाहरुखने केली माजी मुंबई पोलीस आयुक्तांची मस्करी

मुंबई पोलिसांना (Mumbai Police) अभिवादन करण्यासाठी दरवर्षी उमंग हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी परफॉर्म करून पोलिसांचे आभार मानतात.

Shah Rukh Khan: त्या एका व्यक्तीसमोर त्यांनाही झुकावं लागतं; शाहरुखने केली माजी मुंबई पोलीस आयुक्तांची मस्करी
शाहरुखने केली माजी मुंबई पोलीस आयुक्तांची मस्करी
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 08, 2022 | 9:47 AM

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच त्याच्या चित्रपट किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुख कुठेही गेला तरी त्याचे चाहते त्याची पाठ सोडत नाहीत. जगभरात शाहरुखचा मोठा फॅन फॉलोइंग आहे. तो नुकताच मुंबईतील प्रसिद्ध ‘उमंग’ (Umang 2022) या कार्यक्रमात पोहोचला होता. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) अभिवादन करण्यासाठी दरवर्षी उमंग हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी परफॉर्म करून पोलिसांचे आभार मानतात. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खाननेही ‘उमंग 2022’ या मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमातील शाहरुख आणि कॉमेडियन भारती सिंगचा पती हर्ष लिंबाचिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख हर्षसोबत मजामस्करी करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये शाहरुख मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची मस्करी करताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात कॉमेडियन हर्ष लिंबाचियापासून होते. “याठिकाणी अनेक सेलिब्रिटी असताना मी मुंबई पोलिस आयुक्तांवरून नजर हटवू शकत नाही. मुंबई पोलीस आयुक्त बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे,” असं तो म्हणतो. त्यावर शाहरुख गंमतीने म्हणतो की, “जरी सगळ्यांना त्यांचं ऐकावं लागत असलं तरी एक व्यक्ती अशी आहे जिच्यासमोर त्यांनाही येस बॉस, येस बॉस असं म्हणावं लागतं. मुंबई पोलीस आयुक्तांनाही त्या व्यक्तीसमोर झुकावं लागतं आणि ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी.” त्याचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पहा व्हिडीओ

शाहरुख युरोपमध्ये त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचं शूटिंग आटपून गुरुवारी मुंबईत परतला. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नूदेखील मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ‘पठान’ आणि दिग्दर्शक अटलीच्या ‘जवान’मध्येही तो झळकणार आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें