कंगना रनौतच्या ‘धाकड’ चित्रपटाचे भोपाळमधील शूटिंग पूर्ण!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) तिच्या आगामी 'धाकड' (Dhaakad)  चित्रपटाचे भोपाळमधील शूटिंग पूर्ण केलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:31 AM, 22 Feb 2021
कंगना रनौतच्या 'धाकड' चित्रपटाचे भोपाळमधील शूटिंग पूर्ण!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) तिच्या आगामी ‘धाकड’ (Dhaakad)  चित्रपटाचे भोपाळमधील शूटिंग पूर्ण केलं आहे. कंगनाने यांची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. कंगनाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या आगामी धाकड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. कंगनाने एक ट्विट करत म्हटंले आहे की, शेड्यूल रॅप अलर्ट …. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली टीम… सोहेलचे आभार (Shooting of Kangana Ranaut’s Dhaakad completed in Bhopal)

‘धाकड’ काहीतरी वेगळे करेल. आता मी दुसर्‍या प्रकल्पाकडे वाटचाल करत आहे, असे ट्विट  कंगनाने केले. काही दिवसांपूर्वी कंगनाचा धाकड’ चित्रपटातील खतरनाक अवतार समोर आला होता. तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि काळे डाग दिसत होते आणि ती रागाने पाहत होती. कंगनाने हा फोटो शेअर करताना लिहिले होते की, युध्दाचे मैदान अशी एकमेव जागा आहे ज्यामधून ती कधीच बाहेर पडत नाही.

चित्रपटाची शूटिंग शिफ्ट संपल्यानंतर बैतूल शहरामध्ये चक्क खरेदी करण्यासाठी कंगना बाहेर पडली होती. यावेळी कंगना मातीचे भांडे खरेदी करताना दिसली. मातीचे भांडे खरेदी करताना ती एका लहान मुलाला त्या बद्दल प्रश्न विचारताना दिसत होती. तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ट्विटवर तो व्हिडीओ कंगनाने रिट्विट करत म्हटंले होते की, शेवटी नाईट शिफ्ट संपली. काल बैतूलमध्ये खरेदी करण्यासाठी गेले आणि बरीच सुंदर मातीचे भांडे विकत घेतले. मध्यप्रदेशचे कौतुक करण्यासारखे आणि प्रेम करण्याचे बरेच काही इथे आहे. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

Video : ‘सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली.. तरी झाली कुठ चुक मला कळना…’, शालूचा इश्किया अंदाज पाहाच!

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर बॉबी देओलने शेअर केला फोटो!

करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव काय? सोशल मीडियावर खमंग चर्चा!

(Shooting of Kangana Ranaut’s Dhaakad completed in Bhopal)