The Kerala Story | थिएटर मालकांनी घेतलेल्या निर्णयानंतर प्रेक्षकांचा संताप, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे शो या शहरात रद्द
द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. विशेष म्हणजे अनेक वादांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटामध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. चाहत्यांमध्ये सध्या या चित्रपटाची मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.

मुंबई : द केरळ स्टोरी चित्रपटाच्या समस्या काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीयेत. सतत हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतोय. मुळात म्हणजे चित्रपटाचा टिझर (Teaser) रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाला तोंड फुटले. काही जणांनी तर थेट कोर्टात धाव घेत चित्रपटावर बंदी घालण्याची थेट मागणी केली. द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट सतत वादामध्ये आहे. सर्व वाद सुरू असतानाच आज हा चित्रपट (Movie) रिलीज झालाय. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी कोर्टाने फेटाळून लावलीये. मात्र, वाद हा अजूनही कमी झाला नाहीये. दुसरीकडे मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. चित्रपटाने धमाकेदार सुरूवात नक्कीच केलीये.
विशेष म्हणजे अनेकांनी चित्रपट पाहून चित्रपटाचे काैतुक करत सोशल मीडियावर काही पोस्टही शेअर केल्या आहेत. एकीकडे वाद आणि दुसरीकडे प्रेक्षकांचा प्रतिसाद हे चित्र सध्या बघायला मिळतंय. चित्रपट तूफान अशी कामगिरी करणार असल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. या चित्रपटाची स्टोरी ही केरळमधील हिंदू 32 हजार अचानक गायब झालेल्या मुलींवर आधारित आहे.
एकीकडे चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत असतानाच अनेक थिएटर मालिकांनी एक पाऊल मागे घेत चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतलाय. चित्रपटाला होत असलेला विरोध पाहताना अनेक थिएटर मालिकांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाचे शो रद्द केले आहेत. यामुळे हा अत्यंत मोठा फटका द केरळ स्टोरी चित्रपटाला बसला आहे.
रिपोर्टनुसार कोची शहरातील अनेक थिएटर मालिकांनी द केरळ स्टोरी चित्रपटाचे स्क्रीनिंग रद्द केले आहे. कोची शहरातील लुलु मॉलमधील पीव्हीआर आणि ओबेरॉन मॉल आणि सेंटर स्क्वेअर मॉलमधील सिनेपोलिसने स्क्रीनिंग रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मात्र, अजून शो रद्द करण्याचे कोणतेच कारण हे थिएटर मालिकांनी दिले नाहीये. अचानक द केरळ चित्रपटाचे शो रद्द झाल्याने प्रेक्षक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
शहरातील 50 ठिकाणी द केरळ स्टोरी चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार होते. मात्र, प्रत्यक्षात फक्त 17 ठिकाणीच चित्रपटाचे स्क्रीनिंग हे सुरू आहे. थिएटर मालिकांच्या या भूमिकेमुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठे नुकसान होणार असल्याचे स्पष्ट आहे. मुळात म्हणजे द केरळ चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यापासून सतत मोठा वाद सुरू आहे. आता याच पार्श्वभूमीवर थिएटर मालिकांनी अत्यंत मोठा निर्णय घेतलाय.
