Raam Setu : ‘रामसेतु’ चित्रपटासाठी खास तयारी, अक्षय कुमारनं शेअर केला पहिला फोटो

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘रामसेतु’ या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. (Special preparations for the movie 'Raam Setu', the first photo shared by Akshay Kumar)

  • Updated On - 11:37 am, Sun, 7 March 21
Raam Setu : ‘रामसेतु’ चित्रपटासाठी खास तयारी, अक्षय कुमारनं शेअर केला पहिला फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘रामसेतु’ या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा अक्षयनं 2020 मध्ये केली होती. आता चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता चित्रपटाशी संबंधित एक फोटो समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. अक्षय कुमारनं स्वत: रामसेतुशी संबंधित एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षयसोबत खास लोकही झळकत आहेत. (Special preparations for the movie ‘Raam Setu’, the first photo shared by Akshay Kumar)

अक्षयने शेअर केलेल्या या फोटोमध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाच्या कथेवर चर्चा करताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत, खिलाडी कुमारनं एक उत्तम कॅप्शनसुद्धा दिलं आहे हे कॅप्शन लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारनं शेअर केला फोटो

या फोटोमध्ये अक्षय कुमारसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा सुद्धा झळकत आहे. पोस्ट शेअर करत, अभिनेत्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,एकत्र काम करणारी टीम,एकत्रितपणे उत्कृष्ट कामगिरी करते. संध्याकाळी राम सेतुचं वाचन सत्र. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आता जास्त प्रतीक्षा नाही.

अभिषेक शर्मा यांचं दिग्दर्शन

‘राम सेतु’ चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. भगवान राम यांचे जन्मस्थान म्हणजेच अयोध्येत या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सध्या 2022च्या दिवाळीची आहे.

चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

जॅकलिन फर्नांडिसबरोबरच आता या चित्रपटात नुसर्रत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारसोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. नुसरत आता बॉलिवूडमध्ये सतत काम करताना दिसतेय. त्यामुळे प्रेक्षकही तिला प्रचंड प्रेम देत आहे.

अक्षय झळकणार अनोख्या रुपात

या चित्रपटात अक्षय भटकंती करताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयचा लूक खूप वेगळा असेल. पोस्टरमध्ये भगवान रामची प्रतिमा त्यांच्यामागे दिसते. या चित्रपटात अक्षय कुमार लांब केसांमध्ये दिसणार आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. याला प्रेक्षकांचा खूप संमिश्र प्रतिसाद मिळाला. अक्षय कुमारचा हा चित्रपट बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर किती व्यवसाय करतो हे पाहण्यासारखं आहे. त्याचबरोबर स्वत: अक्षय कुमारही अनेक प्रकारे या चित्रपटासाठी तयारी करत आहे. जे खूप खास असणार आहे.

संबंधित बातम्या

आदित्य ठाकरेंच्या वरळीत दिशा पटानीच्या चित्रपटाचं शुटिंग; मनसेच्या नेत्याने घेतला आक्षेप

Video : भाऊ प्रियांक शर्माच्या लग्नात श्रद्धा कपूरचे ठुमके, पाहा व्हिडीओ

Published On - 11:37 am, Sun, 7 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI