Video | दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पठाण चित्रपटाची हवा, ‘झूमे जो पठाण’ गाण्यावर थेट विद्यार्थ्यांसह महिला प्राध्यापकांचा धमाकेदार डान्स

शाहरुख खान किंवा चित्रपटाच्या टिमने खास प्रमोशन या चित्रपटाचे केले नव्हते. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून होता.

Video | दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पठाण चित्रपटाची हवा, 'झूमे जो पठाण' गाण्यावर थेट विद्यार्थ्यांसह महिला प्राध्यापकांचा धमाकेदार डान्स
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 3:01 PM

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त असा प्रतिसाद मिळाला. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने ओपनिंग डेलाच धमाका करत जगभरातून तब्बल 100 कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. पठाण या चित्रपटाची सुरूवातीपासूनच चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत होती. पठाण हा चित्रपट हिट ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटाला रिलीज होऊन आता 26 दिवस जवळपास झाले तरीही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची जादू बघायला मिळत आहे. शाहरुख खान किंवा चित्रपटाच्या टिमने खास प्रमोशन या चित्रपटाचे केले नव्हते. चित्रपट (Movie) रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून होता. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवरील सर्व रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर विशेष धमाल करू शकला नाही.

सध्या सर्वत्र पठाण चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण पठाण चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही किंग खानची जादू बघायला मिळाली.

दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झूमे जो पठाण या गाण्यावर काही विद्यार्थिनींनी आणि महिला प्राध्यापकांनी जोरदार डान्स केलाय. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेकांना हा व्हिडीओ आवडला देखील आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

विशेष बाब म्हणजे बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान याने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शाहरुख खान याने लिहिले की, आपण किती भाग्यवान आहोत की असे शिक्षक आणि प्राध्यापक आहेत जे आपल्याला शिकवू शकतात आणि आपल्यासोबत मजाही करू शकतात. हे सर्व शैक्षणिक रॉकस्टार आहेत..

आता शाहरुख खान याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडलाय. मात्र, काहींनी या व्हिडीओवर टिका करण्यासही सुरूवात केलीये. काहीजण हा व्हिडीओ पाहून प्राध्यापकांना खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

पठाण चित्रपटातील गाण्यावर महिला प्राध्यापकांनी अशा प्रकारे डान्स विद्यापीठामध्ये करणे चुकीचे असल्याचे काहींचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर काही युजर्सने या महिला प्राध्यापकांवर थेट कारवाई करण्याची मागणीही करून टाकलीये.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.