AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिहार जेलमधून सुकेशचं पत्र, जॅकलिनसोबत प्रेमाची कबुली, ‘होय, आम्ही रिलेशनशीपसोबत होतो!’

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाचा कथित सूत्रधार सुकेश चंद्रशेखर यांचे खाजगी फोटो व्हायरल झाले होते. आता सुकेश चंद्रशेखर यांने या फोटोंबाबत मौन सोडलं आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने गुरुवारी तुरुंगातूनच एक नोट जारी केलीय ज्यामध्ये तो जॅकलिनच्या समर्थनार्थ मैदानात उतरला.

तिहार जेलमधून सुकेशचं पत्र, जॅकलिनसोबत प्रेमाची कबुली, 'होय, आम्ही रिलेशनशीपसोबत होतो!'
Jacquline
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 4:49 PM
Share

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez )आणि 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाचा कथित सूत्रधार सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) यांचे खाजगी फोटो व्हायरल झाले होते. आता सुकेश चंद्रशेखर यांनी या फोटोंबाबत मौन सोडलं आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने गुरुवारी तुरुंगातूनच एक नोट जारी केलीय ज्यामध्ये तो जॅकलिनच्या समर्थनार्थ मैदानात उतरला. इतकंच नाही तर या नोटमध्ये सुकेशने आपण आणि जॅकलीन रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिलीय. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. या नात्याचा उद्देश कोणत्याही आर्थिक अपेक्षांशी संबंध नव्हता, असं म्हणत सुकेशने जॅकलिनचा बचाव केला. जेव्हापासून सुकेश आणि जॅकलिनचे फोटो व्हायरल झाले होते, तेव्हापासून जॅकलिन आरोपीच्या पिंजऱ्यात उभी होती.

सुकेशने त्याच्या नोटमध्ये लिहिलंय की, “त्याचे खाजगी फोटो असे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खूप वाईट वाटलं. त्याचा मला खूप त्रास झाला. असं कृत्य करणं कोणाच्याही गोपनीयतेचे आणि वैयक्तिक स्पेसचं उल्लंघन आहे. जॅकलिन आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो हे मी आधीच सांगितलं आहे. हे नातं कोणत्याही आर्थिक फायद्यावर आधारित नव्हते”

जॅकलिनच्या समर्थनार्थ सुकेश मैदानात

सुकेशने लिहिलेल्या नोटमध्ये जॅकलिनचा बचाव केला आहे. जॅकलिनचा खंडणी प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं तो म्हणाला आहे. मी प्रत्येकाला विनंती करतो की तिला चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्ट करणे थांबवा कारण ज्याने कुणी कोणतीही अपेक्षा न करता फक्त प्रेम केलं असेल त्याच्यासाठी हे सोपे नसतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे, सध्या सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिचा कोणताही सहभाग नाही.

सुकेशने आपल्या नोटमध्ये आणखी काय काय म्हटलंय?

या नोटमध्ये सुकेशने जॅकलिनला दिलेल्या भेटवस्तू खंडणीच्या पैशातून घेतल्या नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. जेव्हा एखादा माणूस प्रेमात असतो तेव्हा तो खूप निस्वार्थी मनाने आपल्या प्रेमासाठी वाटेल ते करत असतो. मी तिला काही भेटवस्तू दिल्या. साधारण एक प्रेमी युगुल एकमेकांसाठी जे करतं तेच मी केलं. मी वेगळं काही केलं नाही. नातेसंबंधातील प्रिय व्यक्तीसाठी सर्वसाधारण जे लोकं करतात, मी ही तेच केलंय. मला समजत नाही की ही गोष्ट इतकी मोठी का केली जातीय. तसंच, यापैकी काहीही कथित गुन्ह्यातून मिळालेलं नाही याची मी पुन्हा खात्री देतो. सगळ्य़ा गोष्टी मी माझ्या कमाईतून घेतलेल्या आहेत. लवकरच न्यायालयात सिद्ध होईल, असंही सुकेशने आपल्या नोटमध्ये म्हटलं आहे.

सुकेशने जॅकलिनला आतापर्यंत कोणकोणत्या भेटवस्तू दिल्या?

सुकेश चंद्रशेखरने कथितरित्या जॅकलिनला अनेक लक्झरी भेटवस्तू दिल्या आहेत. ज्यात जिम वेअरसाठी गुच्ची आउटफिट्स, गुच्ची शूज, रोलेक्स घड्याळ, 15 जोड्या महागडे कानातले, 5 बिर्किन बॅग, हर्मीस ब्रेसलेट आणि एलव्ही बॅग यांचा समावेश होता. या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रानुसार त्याने जॅकलिनला एक मिनी कूपर गाडीही दिली होती, जी तिने परत केली. जॅकलिनची अमेरिकेत राहणारी बहीण गेराल्डिन फर्नांडिस हिलाही त्याने बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रानुसार त्याने जॅकलिनच्या आईला एक पोर्चे कार देखील दिली.

सुकेश चंद्रशेखर कोण आहे?

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरचे (Sukesh Chandrasekhar) बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे कनेक्शनही समोर येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्या नावानंतर आणखी अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की, त्याचे श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशीही संबंध आहेत.

संबंधित बातम्या

Video : ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ती’ स्टाईल शहनाजची, अल्लू अर्जुनने तर कॉपी केलीय, खरं नाही वाटत?, व्हिडीओ बघाच…!

Gangubai Kathiwadi : बहुप्रतिक्षित ‘गंगुबाई काठियावाडी’चा ट्रेलर आऊट, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, दोन तासात दीड मिलियन पार

कालच लग्नाचा वाढदिवस साजरा, आज पोस्टर शेअर करत रितेश-जिनिलियाची ‘गुडन्यूज’

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.