AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालच लग्नाचा वाढदिवस साजरा, आज पोस्टर शेअर करत रितेश-जिनिलियाची ‘गुडन्यूज’

अभिनेत्री जिनिलिया देशमुखने तिच्या इन्स्टाग्रामवर एक काही फोटो शेअर केले आहेत. यात रितेश प्रेगनेंट असल्याचं दिसतंय.

कालच लग्नाचा वाढदिवस साजरा, आज पोस्टर शेअर करत रितेश-जिनिलियाची 'गुडन्यूज'
रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 1:07 PM
Share

मुंबई : अभिनेत्री जिनिलिया देशमुखने (Genelia D’Souza Deshmukh) तिच्या इन्स्टाग्रामवर एक काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जिनिलियाचा पती अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) प्रेगनेंट असल्याचं दिसतंय. हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं पण जिनिलियाने आपल्या कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे की हा एक भन्नाट कॉमेडी सिनेमा आहे. ‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy) असं या सिनेमाचं नाव आहे. ‘मिस्टर मम्मी’ या सिनेमात बऱ्याच वर्षांनतर रितेश आणि जिनिलिया एकत्र पहायला मिळणार आहेत. रितेशने याआधीही कॉमेडी सिनेमे केले आहेत. पण जिनिलिया आतापर्यंत रोमॅन्टिक चित्रपटांमध्येच काम करताना दिसली आहे. मात्र आता या सिनेमात पहिल्यांदाच दे दोघे एकत्र कॉमेडी करताना दिसणार आहेत.

रितेश-जिनिलियाची इन्स्टाग्राम पोस्ट

जिनिलिया आणि रितेश नेहमीच आपल्या इन्स्टाग्रामवर काही ना काही शेअर करत असतात. पण आज त्यांनी जरा वेगळे फोटो शेअर केले आहेत. यात रितेश चक्क प्रेग्नेंट असल्याचं दिसंतय. हे फोटो म्हणजे या दोघांच्या आगामी ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचं पोस्टर आहे. या फोटोला “तुम्ही याआधी कधीही न पाहिलेली, पोट धरून हसायला लावणारी अफलातून कॉमेडी तुम्हाला या सिनेमात पहायला मिळणार आहे” असं कॅप्शन जिनिलियाने दिलं आहे. तर “लवकरच एक कॉमेडी चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. त्यामुळे खळखळून हसण्यासाठी तयार राहा”, असं रितेश इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला आहे.

चित्रपटाची गोष्ट

‘मिस्टर मम्मी’ हा रितेश आणि जिनिलिया यांचा हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा एका जोडप्याभोवती फिरते ज्यांची विचारधारा मुलांच्या बाबतीत पूर्णपणे भिन्न आहे. या चित्रपटात विनोदाची परिपूर्ण अनुभुती अनुभवायला मिळणार आहे.

गुलशन कुमार आणि टी-सिरीज यांचा हा सिनेमा आहे. ‘मिस्टर ममी’ हा चित्रपट टी-सीरीज् फिल्म्स आणि हेक्टिक सिनेमा प्रायव्हेट लिमिटेड यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

Madhubala | मधुबालाच्या बहिणीला सुनेने घराबाहेर हाकललं, 96 व्या वर्षी वणवण

बच्चन परिवारावर पुन्हा संकट, जया बच्चन यांना कोरोनाची लागण, करण जोहरने सिनेमाचं शूटिंग थांबवलं

Sonalee Kulkarni Sankrant : म्हणून मी उशिरा संक्रांत साजरी केली, फोटो शेअर करत सोनाली कुलकर्णीने कारण सांगितलं

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.