AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhubala | मधुबालाच्या बहिणीला सुनेने घराबाहेर हाकललं, 96 व्या वर्षी वणवण

माझ्या आईला वहिनी अनेक वर्षांपासून वाईट वागणूक देत असल्याचं मधुबाला यांच्या भाचीने सांगितलं. तर माझ्या बहिणीकडे असलेले पैसेही सुनेकडून काढून घेण्यात आले आहेत, असा आरोप मधुबालाची तिसरी बहीण मधुर यांनी केला.

Madhubala | मधुबालाच्या बहिणीला सुनेने घराबाहेर हाकललं, 96 व्या वर्षी वणवण
मधुबालाच्या बहिणीला सुनेने घराबाहेर हाकललं
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 12:37 PM
Share

मुंबई : ‘बॉलिवूडची मर्लिन मनरो’ अशी ओळख असलेली मधुबाला (Madhubala) अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्य, व्यक्तिमत्त्व आणि चित्रपटांमधून तिने रेखाटलेल्या संवेदनशील स्त्री व्यक्तिरेखांसाठी ती ओळखली जात होती… किंबहुना आजही ओळखली जाते. कारण मधुबालाच्या सौंदर्य आणि अभिनयाचे चाहते तिच्या निधनाला पाच दशकं उलटून गेल्यानंतरही जगभरात आहेत. मधुबालाची आठवण निघण्याचं कारण म्हणजे तिच्या बहिणीसोबत झालेलं गैरवर्तन, तेही चक्क कुटुंबीयांकडून. मधुबालाची बहीण कनिझ बलसारा (Kaniz Balsara) यांना चक्क त्यांच्या सुनेनेच घराबाहेर हाकलल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्यावर वणवण करण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंडमधील घरातून कनिझ यांना सूनबाईंनी बाहेरचा रस्ता दाखवल्याने त्यांना एकटीने विमान पकडून मुंबईतील लेकीकडे येण्याची वेळ आली.

सुनेने घराबाहेर हाकलले

23 फेब्रुवारी 1969 रोजी प्रदीर्घ आजारामुळे मधुबालाने अखेरचा श्वास घेतला, आणि तिची बहरणारी कारकीर्द संपुष्टात आली. तिच्या पश्चात कनिझ बलसारा आणि मधुर भूषण या दोन बहिणी आहेत. ETimes च्या वृत्तानुसार, 96 वर्षीय कनिझ बलसारा यांना त्यांच्या विधवा सुनेने न्यूझीलंडमधील घरातून बाहेर काढले आणि एकटीने मुंबईला जाण्यासाठी विमानात बसवले.

न्यूझीलंडहून मुंबईतील लेकीकडे

कनिझ यांची कन्या परवीज मुंबईतील वांद्रे भागात राहते. तिला चुलत भावामार्फत ही माहिती मिळाली. सून समीना आपल्या आईला अनेक वर्षांपासून वाईट वागणूक देत असल्याचं परवीजने सांगितलं. माझ्या बहिणीकडे असलेले पैसेही सुनेकडून काढून घेण्यात आले आहेत, असा आरोप कनिझ यांची धाकटी बहीण मधुर यांनी केला.

परवीजला विमानतळ प्राधिकरणाने फोन करुन बोलावले होते. निराधार असलेल्या आईकडे एक छदामही नव्हती. त्यामुळे ती भारतात प्रवेशासाठी अनिवार्य असलेली कोव्हिड-19 (RTPCR) चाचणीही करु शकली नाही.

मधुबालाची चकाकती कारकीर्द

14 फेब्रुवारी 1933 मध्ये मुमताज जहाँ बेगम देहलवीचा जन्म दिल्लीतील बॉम्बे टॉकीज फिल्म स्टुडिओजवळ असलेल्या गावात झाला. वयाच्या 9 व्या वर्षी ती पहिल्यांदा सिनेमात झळकली, तेव्हा तिचे नाव बेबी मुमताज होते. एक बाल कलाकार म्हणून तिने आपल्या कुटुंबाला आधार दिला. अल्प काळातच ती आघाडीची सुपरस्टार झाली. पडद्यावरील लालित्य आणि विलक्षण अभिनय कौशल्यासाठी ती ओळखली जाऊ लागली. पुढे तिला मधुबाला हे नाव मिळाले.

‘अमर’, ‘चलती का नाम गाडी’, ‘मुगल-ए-आझम’, ‘बरसात की रात’ यांसारख्या काही उत्कृष्ट क्लासिक चित्रपटांतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

संबंधित बातम्या :

नौशाद अलींची अन्नपाण्यावाचून 12 तास मेहनत, तेव्हा बनले ‘मुगल-ए-आजम’चे प्रसिद्ध गाणे, वाचा किस्सा…

‘मुघल-ए-आझम’च्या निर्मितीवर खर्च झाला पाण्यासारखा पैसा, तिकिटासाठीही चार दिवस रांगेत उभे होते प्रेक्षक!

 ‘अच्छा जी मैं हारी’ म्हणत बाप-लेकीने गायलं अप्रतीम गाणं, लोक म्हणाले, गाणं ऐकून आमचा दिवस बनला!

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.