नौशाद अलींची अन्नपाण्यावाचून 12 तास मेहनत, तेव्हा बनले ‘मुगल-ए-आजम’चे प्रसिद्ध गाणे, वाचा किस्सा…

दिग्दर्शक के.आसिफ यांच्या 1960मध्ये रिलीज झालेल्या 'मुगल-ए-आजम'चे 'जब प्यार क्या तो डरना क्या' हे गाणे कानावर पडले की, या चित्रपटाची भव्यता डोळ्यांसमोर उभी राहते.

नौशाद अलींची अन्नपाण्यावाचून 12 तास मेहनत, तेव्हा बनले ‘मुगल-ए-आजम’चे प्रसिद्ध गाणे, वाचा किस्सा...
नौशाद अली
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 9:00 AM

मुंबई : दिग्दर्शक के.आसिफ यांच्या 1960मध्ये रिलीज झालेल्या ‘मुगल-ए-आजम’चे ‘जब प्यार क्या तो डरना क्या’ हे गाणे कानावर पडले की, या चित्रपटाची भव्यता डोळ्यांसमोर उभी राहते. दिलीप कुमार (Dilip Kumar), पृथ्वीराज कपूर (Pritviraj Kapoor) आणि मधुबाला (Madhubala) या कलाकारांचा अभिनय या गाण्याच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. लता मंगेशकरांच्या आवाजाची जादू अजूनही आपल्याला हे गाणे ऐकण्यास भाग पाडते. परंतु हे गाणे इतके सुमधुर आणि सुंदर बनवण्याचे श्रेय जर कुणाला गेले, तर ते नौशाद अली साहेब (Music composer Naushad Ali) होते (Veteran Music composer Naushad Ali share an interesting story behind pyar kiya to darna kya song).

नौशाद अली यांना भारतीय हिंदी चित्रपटांतील संगीताचा मास्टर म्हटले गेले, तर ते चुकीचे ठरणार नाही. 6 दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक उत्तम संगीत दिले. चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे. त्यांच्या वाद्याची जादू नेहमीच चित्रपटांच्या गाण्यांसोबत मिसळून रसिकांना मोहित करत असे. त्यांच्या गाण्यांमध्ये अभिजात आणि लोकसंगीताचा अद्भुत वापर होता, ज्याने जुन्या आणि सध्याच्या पिढीला भुरळ घातली आहे.

लखनऊमध्ये सुरु झाला सांगीतिक प्रवास

‘बैजू बावरा’ या संगीत चित्रपटांपासून ते  ‘आन’, ‘मदर इंडिया’, ‘मेरे मेहबूब’, ‘अमर’, ‘दुलारी’ यासारख्या सुमारे 67 चित्रपटांमध्ये उत्तम संगीत देत त्यांनी कधी लोकांना हसवले तर कधी रडवले.  नौशाद अली यांचा जन्म लखनऊमध्ये झाला होता. हेच तेच शहर आहे जिथून त्यांचा सांगीतिक प्रवास सुरु झाला. नौशाद साहेबांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला ज्याचे विचार बर्‍यापैकी पुराणमतवादी होते. त्याचे वडील वाहिद अली कोर्टात ‘मुंशी’ म्हणून काम करायचे. लहानपणीच नौशाद यांचा संगीताकडे कल होता. तथापि, त्यांच्या वडिलांना हे संगीत अजिबात आवडत नव्हते. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत नौशाद अली साहब यांनी एकदा त्या दिवसांच्या आठवणीना उजाळा दिला जेव्हा त्यांच्या वडिलांनी संगीत शिक्षणाला तीव्र विरोध केला होता.

जेव्हा वडील म्हणाले, घर किंवा संगीत निवडा…

ते म्हणाले होते की, “जेव्हा मी दहा वर्षांचा होतो तेव्हापासून माझे उस्ताद बबन साहेब आणि लद्द्न साहेब यांच्याकडून लखनऊमध्येच संगीत शिकलो. यानंतर लखनौचे सितारनवाज असलेले उस्ताद युसुफ अली साहेब यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले. ठुमरी, दादरा ताल आणि ख्यालपर्यंत पोहोचलो तेव्हा माझे लक्ष भरकटले. मी विचार करू लागलो की कदाचित मला हे सर्व नको आहे. मला काय पाहिजे हे मला माहित नव्हते. प्रथम हार्मोनियमवर आणि नंतर सितारवर सराव केला, परंतु कुठेच मन लागत नव्हते.”( Veteran Music composer Naushad Ali share an interesting story behind pyar kiya to darna kya song)

“त्यानंतर मला हळूहळू समजले की माझ्याकडे कंपोजिशन ट्यून करण्याची कला आहे. माझे वडील त्याच्या विरोधात होते. त्याने मला सांगितले- ‘तू कशाला गायकांच्या लाईनमध्ये जातो आहेस. कोणीही तुझ्याशी लग्न करणार नाही आणि तुला पंचायतमधून पूर्णपणे काढून टाकले जाईल.’ एके दिवशी पुन्हा ते म्हणाले की, तुला हे घर हवे आहे की संगीत? ते आताच ठरव. त्यावर नौशादजी म्हणाले, तुम्ही तुमचे घर घ्या आणि मला माझे संगीत द्या. असे म्हणून त्यांनी 1973 घर सोडले आणि निघून गेले.

ज्या फुटपाथवर ते झोपले, 16 वर्षांनंतर त्या समोरील थिएटरमध्ये झाला सन्मान

नौशाद अली यांनी आपल्या वडिलांचे घर सोडले आणि ते थेट मुंबईला गेले, जेथे त्यांना कोणाचाही परिचय नव्हता किंवा ओळखीचे नव्हते. येथे त्यांनी बरीच वर्षे फुटपाथवर घालवली. या फुटपाथसमोर एक थिएटरही होते, जिथे बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांचा सन्मान झाला. हा पुरस्कार नौशाद अली यांना त्यांच्या ‘बैजू बावरा’ चित्रपटातील उत्तम संगीतासाठी देण्यात आला होता. त्यावेळी नौशाद साहेब म्हणाले होते, ‘त्या फुटपाथवरून या बाजूस येण्यास मला 16 वर्षे लागली.’

12 तासांत तयार केले ‘मुगल-ए-आजम’चे गाणे

या मुलाखतीदरम्यान नौशाद अली यांनी ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला. या चित्रपटातील एका गाण्यासाठी संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कसाप्रकारे एकाच खोलीत घालवले ते सांगितले. ते म्हणाले होते- ‘मुगल-ए-आजम’ दरम्यान आसिफ यांनी आम्हाला सांगितले की, हा एक सीन आहे आणि तुम्ही त्यावर गाणे बनवावे. गाणे असे असले पाहिजे की लोकांना ते नेहमी आठवेल.’ त्यावर ते म्हणाले की, असं गाणं बनवता येईल की नाही ते देवाच्या हाती आहे.

त्यांनी मुंबईतील आपल्या घरी गीतकार शकील यांना बोलवले. गच्चीवर एक खोली होती, जिथे ते एकटे बसून हे काम करायचे. संध्याकाळचे सहा वाजले होते. त्यांनी दार बंद केले. दोघेही आता बसले होते. तो काहीतरी लिहित होते आणि नौशादजी काहीतरी ट्यून करत होते. खोलीभर कागद पसरले होते. तिथे केवळ कागद विखुरलेले होते,चहा, पाणी, अन्न यातील काहीच नव्हते. किती वेळ गेला हे माहित नव्हते. पण बर्‍याच वेळानंतर त्यांनी मोठा उसासा घेतला आणि मग चर्चा झाली. ते गाणे होते – ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे लिहून जेव्हा दोघे बाहेर आले, तेव्हा पहाटेचे सहा वाजले होते.’ अशा प्रकारे अन्नपाण्यावाचून तब्बल 12 तास मेहनत घेतल्यानंतर एक अजरामर गाणे तयार झाले होते.

(Veteran Music composer Naushad Ali share an interesting story behind pyar kiya to darna kya song)

हेही वाचा :

Video | ‘एक्स अँड नेक्स्ट’ जेव्हा दीपिका-आलिया एकत्र गातात रणबीरचं ‘चन्ना मेरेया’ गाणं, पाहा व्हिडीओ

कोरोना काळात सिने कर्मचाऱ्यांना ‘यशराज फिल्म्स’चा मदतीचा हात, 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाची व्यवस्था!

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.