Video: ‘अच्छा जी मैं हारी’ म्हणत बाप-लेकीने गायलं अप्रतीम गाणं, लोक म्हणाले, गाणं ऐकून आमचा दिवस बनला!

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक बाप-लेक हिंदी चित्रपटातील गाणं गात आहेत. मुलगी गाणं गाण्यासोबतच गिटार वाजवत आहे

Video: 'अच्छा जी मैं हारी' म्हणत बाप-लेकीने गायलं अप्रतीम गाणं, लोक म्हणाले, गाणं ऐकून आमचा दिवस बनला!
वडील-मुलीच्या जोडीने सोशल मीडियावर एक गाणं गाऊन लोकांची मने जिंकली

आपल्या सर्वांना गाणी आवडतात, म्हणून कधीकधी जेव्हा आपण कंटाळा येतो तेव्हा अनेकजण तास न तास गाणी ऐकतात. खरं म्हणजे काही लोकांच्या आवाजात अशी जादू असते, जो आवाज थेट काळजाला भिडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वडील-मुलीच्या जोडीने सोशल मीडियावर एक गाणं गाऊन लोकांची मने जिंकली आहेत. (Father and daughter sing a song in magical voice video goes viral on social media)

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक बाप-लेक हिंदी चित्रपटातील गाणं गात आहेत. मुलगी गाणं गाण्यासोबतच गिटार वाजवत आहे. 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘काला पानी’ चित्रपटातील ‘अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना’ हे गाण आहे. देवानंद आणि मधूबाला या सुपरहीट जोडीवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे दोघेही मिळून हे गाणं गाऊ लागतात. दोघांनी हे गाणं इतकं सुंदररित्या गायलं आहे, की हे पाहिल्यानंतर तुमचा दिवस चांगला होईल

व्हिडीओ पाहा:

 

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप शेअर केला जात आहे. Twitter यूजर ARanganathan72 ने वडील-मुलीची ही उत्कृष्ट क्लिप शेअर केली आणि त्यात या युजने लिहलं आहे , आज तुम्ही इंटरनेटवर सर्वोत्तम 2 मिनिटे घालवाल. गोंडस आणि अप्रतिम, @ijuhising आणि तिचे वडील.

बातमी लिहीली जाईपर्यंत या व्हिडीओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 10 हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच, शेकडो लोक वडील आणि मुलीच्या आवाजाचे चाहते बनले आहेत. देवानंद आणि अभिनेत्री मधुबाला यांच्यावर ‘अच्छा जी मैं हारी…’ चे चित्रीकरण करण्यात आले. मजरुह सुलतानपुरींनी हे गाणं लिहलं आहे. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी हे गाणं गायलं आहे आणि अर्थातच, इतकं या गाण्याला अतिउत्तम संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ आम्हाला नक्की कळवा

हेही पाहा:

पतीने दिले गुलाबाचे फूल, पत्नी लाजत म्हणाली – ‘प्यार का नशा चढ़ा हुआ है’, पाहा भन्नाट व्हायरल व्हिडीओ

Video: ना कुठला मेकअप, ना भारी ड्रेस, एका स्मितहास्याने तिने नेटकऱ्यांची मनं जिंकली, पाहा पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI