AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R Madhavan : सुपरस्टार आर. माधवन याच्या गळ्यात एफटीआयआय अध्यक्षपदाची माळ

FTII : केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. नुकतंच आर माधवन याच्या फिल्म रॉकेट्री: द नांबी इफेक्ट या चित्रपटला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

R Madhavan :  सुपरस्टार आर. माधवन याच्या गळ्यात एफटीआयआय अध्यक्षपदाची माळ
| Updated on: Sep 01, 2023 | 9:27 PM
Share

मुंबई : सुपरस्टार आर. माधवन याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फिल्म अँड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात टाकण्यात आली आहे. केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्वीट करून ही बातमी दिली आहे. अनुराग ठाकुर यांच्या ट्वीटनंतर अभिनेता आर. माधवन यानेही उत्तर देत आभार व्यक्त केले आहे. “या सन्मानासाठी मी मनापासून आभार मानू इच्छितो. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.”, आर माधवन याने लिहिलं आहे. आर. माधवन यांच्या आधी फिल्म मेकर शेखर कपूर या पदावर होते. पण त्यांचा कार्यकाल 3 मार्च 2023 रोजी संपला आहे.  नुकतंच आर माधवन याच्या फिल्म ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी काय ट्वीट केलं?

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, “आर माधवन यांना एफटीआयआय आणि गव्हर्निंग काऊंसिलचे अध्यक्ष झाल्याप्रकरणी हार्दिक शुभेच्छा. मला विश्वास आहे की तुमचा दीर्घ अनुभव आणि नैतिकता या संस्थेला समृद्ध करेल. सकारात्मक बदल होतील आणि उच्च स्तरावर लौकीक पोहोचेल. माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत.”

काही दिवसांपूर्वी आर. माधवन याची बरीच चर्चा रंगली होती. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी डिनरचं आयोजन केलं होतं. या डिनरसाठी आर माधवन याने हजेरी लावली होती. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा आर माधवन याने इंस्टाग्रामवर डिनरचे काही फोटोही शेअर केले होते आणि दोन्ही नेत्यांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रानसच्या राष्ट्रीय दिवसासाठी मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं.

दोन दशकाहून अधिक काल माधवन फिल्म इंडस्ट्रीत

आर. माधवन याने 2001 मध्ये रहना तेरे दिल में या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. माधवनने या व्यतिरिक्त रंग दे बसंती, 3 इडियट्स, तनु वेड्स मनु आणि तनु वेड्स मनु रिटर्न्ससारख्या चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचं प्रत्येक वेळी कौतुक झालं आहे. आर. माधवन याच्या फिल्म रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा चिच्रपट इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनातील संघर्षावर आहे. चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, नंबी नारायण यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला होता. त्यानंतर यातून सुटका झाल्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही इंजिन बनवलं.

भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था (FTII) ची स्थापना 1960 मध्ये पुण्याच्या प्रभात स्टुडिओ परिसरात भारत सरकारकडून केली होती. चित्रपट निर्मितीत प्रभात स्टुडिओचा मोठा हातभरा होता. या संस्थेत नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, राजकुमार राव यासारख्या अभिनेत्यांनी शिक्षण घेतलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.