Suroor 2021 | हिमेश रेशमियाचा धमाकेदार कमबॅक, ‘सूरूर 2021’चे पहिले गाणे प्रदर्शित!

गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याच्या ‘सूरूर 2021’ (Suroor 2021) या अल्बमची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून, काल (11 जून) या अल्बमचा टायटल ट्रॅक प्रदर्शित झाला आहे.

Suroor 2021 | हिमेश रेशमियाचा धमाकेदार कमबॅक, ‘सूरूर 2021’चे पहिले गाणे प्रदर्शित!
हिमेश रेशमिया


मुंबई : गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याच्या ‘सूरूर 2021’ (Suroor 2021) या अल्बमची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून, काल (11 जून) या अल्बमचा टायटल ट्रॅक प्रदर्शित झाला आहे. या अल्बमसह हिमेशने आपल्या जुन्या स्टाईलमध्ये कमबॅक केला आहे. ‘आप का सूरूर’ या त्याच्या पहिला अल्बम प्रमाणेच, त्यांने यावेळीही टोपी परिधान केली आहे (Suroor 2021 Himesh Reshammiya released his first song from new album).

हिमेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हे गाणे रिलीज केल्याची माहिती दिली आहे. कॅप्शनमध्ये तो म्हणाला, ‘हिमेश रेशमिया मेलॉडीज या यूट्यूब वाहिनीवर ‘सूरूर 2021’चा टायटल ट्रॅक प्रदर्शित झाला आहे. त्यास आपले खूप प्रेम द्या. जय माता दी, लेट्स रॉक. सूरूर गर्ल उदिती सिंग.’

पाहा हिमेशची पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

या गाण्यात उदिती सिंग हिमेश रेशमियासोबत दिसली आहे. हिमेशचे हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे. 1 लाखाहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे आणि त्याचे चाहते देखील खूप आनंदित झाले आहेत. एका चाहत्याने कमेंट केली की, ‘छा गया सर छा गया…’. त्याच वेळी, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘माइंड ब्लोविंग, उत्तम दर्जेदार गाणे.’

हिमेशचा दुहेरी लूक

या गाण्यात हिमेश रेशमिया दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला आहे. एकामध्ये त्याची रॉकस्टार सारखी टोपी आणि दुसर्‍यात एका व्यावसायिकाच्या लूकमध्ये दिसला आहे. व्हिडीओच्या उत्तरार्धात हिमेश एका स्टेडियममध्ये सादरीकरण करताना दिसला आहे, जिथे हजारो लोक त्याचा जयजयकार करत आहेत. व्हिडीओच्या शेवटी, एक महिला रॉकस्टार हिमेशकडे धावत येते आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकवते. यादरम्यान, गाण्यात असे लिहिले आहे की, ती रॉकस्टारची पत्नी आहे.

पाहा गाणे :

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, हिमेश रेशमिया सध्या इंडियन आयडॉल 12 या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसला आहे. शोमध्ये हिमेशची स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडते. सूरूरच्या पहिल्या गाण्याबाबत हिमेशने म्हटले होते की, तो बर्‍याच दिवसांपासून या अल्बमवर काम करत आहे. या अल्बमसाठी त्याने बरीच गाणी तयार केली आहेत. इतर गायकांनी देखील या अल्बममध्ये गाणी गायली आहेत आणि त्यांच्या व्हिडीओंचीही उत्तम प्रकारे योजना आखली जात आहे.

(Suroor 2021 Himesh Reshammiya released his first song from new album)

हेही वाचा :

Photo : ‘आयुष्य एक सुंदर नृत्य आहे…’ म्हणत रुबीना दिलैकनं शेअर केलं हे क्लासी फोटोशूट

Shilpa Shetty| शिल्पा शेट्टीचा नकार, तरीही राज कुंद्राने केले माजी पत्नीबद्दल अनेक खुलासे!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI