AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty| शिल्पा शेट्टीचा नकार, तरीही राज कुंद्राने केले माजी पत्नीबद्दल अनेक खुलासे!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि राज कुंद्रा (Shilpa Shetty) बॉलिवूडच्या क्युट आणि परिपूर्ण जोडप्यांपैकी एक आहेत. राज यांचे हे दुसरे लग्न आहे. जेव्हा त्यांच्यात आणि शिल्पा यांच्यात जवळीक वाढली होती, तेव्हा दोघांनीही लग्न केले.

Shilpa Shetty| शिल्पा शेट्टीचा नकार, तरीही राज कुंद्राने केले माजी पत्नीबद्दल अनेक खुलासे!
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 10:38 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि राज कुंद्रा (Shilpa Shetty) बॉलिवूडच्या क्युट आणि परिपूर्ण जोडप्यांपैकी एक आहेत. राज यांचे हे दुसरे लग्न आहे. जेव्हा त्यांच्यात आणि शिल्पा यांच्यात जवळीक वाढली होती, तेव्हा दोघांनीही लग्न केले. त्यावेळी राजची माजी पत्नी कविता म्हणाली होती की, शिल्पा शेट्टीच तिचे आणि राजचे लग्न तुटण्याचे कारण होती. अलीकडेच कविताची ही जुनी मुलाखत बरीच व्हायरल होत होती, त्यानंतर राजने आपल्या भूतकाळाबद्दल आणि माजी पत्नीबद्दल मोठे खुलासे केले आहेत (Shilpa Shetty husband Shilpa Shetty talks about his ex wife Kavita).

मात्र, शिल्पाने याबद्दल काही बोलण्यास नकार दिला आहे. त्याचा काही उपयोग नसला तरी राज यांनी आपला मुद्दा सर्वांसमोर ठेवला आहे. राज पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ‘माझे कुटुंब माझे सर्वकाही आहे आणि ती माझ्या घरातील सर्व सदस्यांशी भांडत असे. आम्ही एकाच घरात राहत होतो. आई, वडील, बहीण आणि तिचा नवरा आम्ही एकत्रच राहत होतो, कारण ते त्यावेळी भारतातून युकेमध्ये स्थायिक झाले होते. याकाळात ती माझ्या बहिणीच्या पतीच्या जवळ आली होती आणि विशेषत: जेव्हा मी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलो होतो. तेव्हा ती त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत असे. माझ्या कुटुंबातील अनेकांनी, माझ्या ड्रायव्हरने सांगितले की दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. परंतु, कोणाच्याही शब्दावर माझा कधीच विश्वास नव्हता. तरीही मी दोन्ही कुटुंबांना आनंदी ठेवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करायचो.’

‘त्यानंतर माझी बहीण व तिचा नवरा परत भारतात आले. कारण एकत्र राहण्यामुळे सर्व काही ठीक सुरु नव्हते. माझ्या बहिणीचा नवरा आणि माझी माजी पत्नी एकत्र काम करण्यासाठी जात असत, त्याच खोलीत एकत्र बसत. तेव्हा माझ्या बहिणीला असे वाटले की, आता भारतात परत जाणे चांगले. यानंतर, जेव्हा या विषयावर कोणी बोलत असे, तेव्हा मी ऐकण्यास नकार द्यायचो. मग जेव्हा मला कळले की, माझी माजी पत्नी गरोदर आहे, तेव्हा मी खूप उत्साही झालो होतो. आम्हाला एक मुलगी झाली आणि नंतर घरी आल्यावर मला असे जाणवले की, ती बाथरूममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत असे. जिथे पूर्वी ती 20-30 मिनिटांत बाथरूममधून बाहेर येत असे, आता ती एक तासाने किंवा अधिक वेळानंतर बाहेर येत असे. सुरुवातीला मला वाटले की, कदाचित तिच्या नुकत्याच झालेल्या प्रसूतीमुळे असे झाले असेल, परंतु सत्य काहीतरी वेगळे होते.’

‘राज’ झाले उघड!

राज म्हणाला, ‘एक दिवस मला माझ्या बहिणीचा भारतातून फोन आला आणि ती रडत म्हणाली की, तिला तिच्या पतीचा दुसरा फोन सापडला आहे, ज्यामध्ये यूकेच्या नंबरवरून खूप मेसेज आले आहेत. त्या मेसेजमध्ये असे लिहिले होते की, दोघांनी एकत्र एकत्र घालवलेले क्षण आठवत आहेत. यूके नंबरवरून आणखी एक संदेश आला होता की, तू मला सोडून गेलीस आणि मला तुझी आठवण येत आहे. चौकशी केल्यानंतर मला माझ्या मित्राच्या मदतीने कळले की, हा नंबर माझ्या घराशेजारी असलेल्या काही टॉवरशी जोडलेला आहे. त्यानंतर मला संशयास्पद वाटले (Shilpa Shetty husband Shilpa Shetty talks about his ex wife Kavita).

मग एके दिवशी कविता शॉपिंगला गेली होती तेव्हा मला बाथरूममध्ये असलेल्या बॉक्सवर फोन सापडला. मी तो फोन चालू केला आणि ते मेसेज वाचले. त्या दिवशी माझे हृदय तुटले होते आणि मी खूप रडलो आणि विचार केला की मी काय चूक केली की हे सगळं माझ्या बाबतीत घडलं. त्यावेळी बहिणीने सांगितले की, तिला आता तिच्या पतीबरोबर राहायचे नाही. मी भारतात गेलो आणि माझ्या बहिणीला आणि तिच्या मुलांना घरी आणले. यावेळी मी कविताला घरी नेऊन सोडले.

पत्नीला घरी सोडले!

राज म्हणाले, ‘यानंतर मी घरी परतलो, असं वाटलं की असं काही घडलं नव्हतं. लंडनला पोहोचताच आम्ही वंश आणि कविताला निरोप पाठविला की, आता सर्व काही संपले आहे आणि या दोघांनाही भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माझ्या बहिणीने एका मुलीला जन्म दिला. मात्र, तिच्या नवऱ्याने तिला तिच्याबद्दल विचारले देखील नाही किंवा आपल्या मुलांची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर मी माझ्या मुलीच्या ताबा मिळवण्यासाठी लढा दिला पण ब्रिटीश कायद्याने मला फक्त तिला भेटण्याची परवानगी दिली आणि आठवड्यातून एकदा तिला घरी आणण्यास परवानगी दिली. ती तिच्या आईबरोबर राहत होती. 9 महिन्यांपासून विभक्त झाल्यानंतर, मी पुन्हा घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली.

खोटी बातमी दिली!

राज पुढे म्हणाला, ‘यानंतर जेव्हा मी शिल्पाला भेटलो आणि आमची मैत्री झाली आणि माझ्या माजी पत्नीला हे कळले तेव्हा तिने आपली पैशांची मागणी वाढवली. पैशासाठी तिने खोट्या बातम्या पसरवल्या की, शिल्पामुळे आमचे लग्न मोडले. या मुलाखतीनंतर राज यांनी सांगितले की, शिल्पा माझ्या मुलाखतीनंतर थोडी दु:खी झाली आहे. मी त्या जुन्या किस्सांबद्दल आता बोलू नये, असे तिला वाटत होते. परंतु सत्य बाहेर आलेच पाहिजे.

(Shilpa Shetty husband Shilpa Shetty talks about his ex wife Kavita)

हेही वाचा :

‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका, हॉलिवूडची टीम डिझाईन करणार नवा लूक!

पवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला! बायोपिकबाबत चर्चा?

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.