AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका, हॉलिवूडची टीम डिझाईन करणार नवा लूक!

रावणाचे पात्र अधिक उठावदार होण्यासाठी त्याच्या लूकची खास पद्धतीने रचना करण्याची तयारी सुरू आहे. या अहवालांनुसार, यूएस बेस्ड कॉस्च्युम टीम हृतिकच्या या लूकसाठी विशेष मेहनत घेणार आहे. ही तीच टीम आहे, ज्यांनी ‘अवतार’ चित्रपटासाठी पोशाख डिझाईन केले होते.

‘रामायणा’त ह्रतिक रोशन साकारणार ‘रावणा’ची भूमिका, हॉलिवूडची टीम डिझाईन करणार नवा लूक!
हृतिक रोशन
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 7:07 AM
Share

मुंबई : निर्माता मधु मंटेना यांचा ‘रामायण’ (Ramayana) हा चित्रपट या दिवसांमध्ये खूप चर्चेत आला आहे. माध्यम अहवालानुसार या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दक्षिणचा स्टार महेश बाबू (Mahesh Babu) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जर, या अहवालांवर विश्वास ठेवला तर, हृतिक रोशनच्या या चित्रपटात रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप मुख्य कलाकारांविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा चित्रपट खास बनवण्यासाठी मेकर्स परिश्रम घेत आहेत (Avatar Costume Team to Style Hrithik Roshan As Ravana in Ramayana).

रावणाचे पात्र अधिक उठावदार होण्यासाठी त्याच्या लूकची खास पद्धतीने रचना करण्याची तयारी सुरू आहे. या अहवालांनुसार, यूएस बेस्ड कॉस्च्युम टीम हृतिकच्या या लूकसाठी विशेष मेहनत घेणार आहे. ही तीच टीम आहे, ज्यांनी ‘अवतार’ चित्रपटासाठी पोशाख डिझाईन केले होते. मेकर्स आणि टीममधील हा करार फायनल झाला, तर ही टीम हृतिक रोशनसाठी खास रावणच्या लूकची रचना करेल.

‘रामायण’ ठरणार बिग बजेट चित्रपट

मधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाचे बजेट सुमारे 500 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण 3 डी तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार आहे. मधु मंटेना, नील मल्होत्रा ​​आणि अल्लू अरविंद या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे (Avatar Costume Team to Style Hrithik Roshan As Ravana in Ramayana).

प्रभासलाही झाली होती विचारणा!

या आधी या चित्रपटातील ‘रामा’च्या भूमिकेसाठी निर्माते मधु मंटेना यांनी प्रभासकडेही संपर्क साधला होता. परंतु, ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात तो आधीपासूनच ‘रामा’ची भूमिका साकारत आहे. ‘आदिपुरुष’ची घोषणा झाल्यानंतर, लगेचच मधु मंटेनाने ‘रामायण 3 डी’ची घोषणा केली. चित्रपटासाठी त्याला निर्माते देखील मिळाले आहेत. ‘रामायण’ चित्रपटाची टीम एका अशा सुपरस्टारचा शोध घेत आहे, जो ‘रामा’ची भूमिका उत्तम प्रकारे साकारू शकेल आणि त्यांच्या मते, महेश बाबू या भूमिकेत चपखल बसेल.

फँटम फिल्म्स एकट्याने चालवणार!

स्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार, मधु मंटेनाने, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि विकास बहल यांच्याकडून फँटम फिल्म्सची हिस्सेदारी खरेदी केली आहे. आता फँटम फिल्म तो एकट्याने चालवणार आहे. फँटम फिल्म्सच्या बॅनरखाली तो आपला ड्रीम प्रोजेक्ट बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असेही म्हटले जात आहे की, मधु मंटेना त्यांचा ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित करणार आहे. कारण, इतक्या मोठ्या महाकाव्याची कथा एका चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे कठीण आहे.

(Avatar Costume Team to Style Hrithik Roshan As Ravana in Ramayana)

हेही वाचा :

अभिनेत्री हनिया आमीरच्या इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान चाहत्याचे घृणास्पद कृत्य, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Video | अल्लू अर्जुनच्या गाण्यावर कार्तिक आर्यनचा धमाल डान्स, व्हिडीओ पाहून बॉलिवूडकरही अवाक्!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.