AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला! बायोपिकबाबत चर्चा?

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) शुक्रवारी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची भेट घेणार आहेत. शाहरुख खानचं मुंबईतील घर मन्नत येथे ही बैठक होणार आहे.

पवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला! बायोपिकबाबत चर्चा?
Prashant Kishor - shahrukh khan
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 8:48 PM
Share

मुंबई : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) शुक्रवारी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची भेट घेणार आहेत. शाहरुख खानचं मुंबईतील घर मन्नत येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत प्रशांत किशोर यांच्यावर चित्रपट (बायोपिक) बनवण्याबाबत चर्चा होऊ शकते. यापूर्वी प्रशांत किशोरवर चित्रपट बनविण्याबाबत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. (Prashant Kishor Will meet Shahrukh Khan at Mannat Mumbai)

निवडणूक रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांची चांगली आणि चर्चित कारकीर्द आहे. त्यांच्या विविध धोरणांमुळे बर्‍याच मोठ्या पक्षांना निवडणुका जिंकण्यात मदत झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस प्रशांत किशोरच्या आयुष्यावर आधारित वेब सीरिज बनवू शकतं. तथापि, अद्याप ही बाब प्रशांत किशोर यांनी मंजूर केलेली नाही.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक

दरम्यान, आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात सिल्व्हर ओकवर तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार आणि आमदार रोहित पवार पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान, या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, देशातील यूपीएचं नेतृत्व, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर उभं करण्याचं आव्हान आणि यूपीए – 2 बाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

शरद पवार, प्रशांत किशोर भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

  • 2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा
  • देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार?
  • बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीवर चर्चा,
  • आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरही चर्चा,
  • पुढील काळात राष्ट्रवादीची रणनिती आणि राजकीय कार्यक्रमाबाबत चर्चा

राजकीय रणनीती आखण्याचं काम सोडलं

दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती आखण्याचं आणि राजकीय सल्ले देण्याचं काम सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी ही भेट नाही, असंही अजित पवार म्हणाले.

भेट राजकीय नाही : अजित पवार

अजित पवार यांनी आषाढी वारीबद्दल माहिती देताना पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत, असं पवार म्हणाले.

इतर बातम्या

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं शिवसेनेकडून स्वागत, पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच – अरविंद सावंत

पवार-प्रशांत किशोर भेटीत ‘मविआ’ आणि ‘बंगाल मॉडेल’वर चर्चा?; जयंत पाटील ‘सिल्व्हर ओक’वर तातडीने दाखल

‘शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी’, नारायण राणेंचा दावा

(Prashant Kishor Will meet Shahrukh Khan at Mannat Mumbai)

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.