Dilip Kumar Health Update | दिलीप कुमारांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पत्नी सायरा बानो यांच्यासह घरी रवाना

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज (11 जून) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या प्रकृतीमध्ये आता बरीच सुधारणा झाली आहे. प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटल मधून स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत आणले गेले. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जात आहे.

1/7

2/7
रविवारी (6 जून) दिलीप कुमार यांना श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या फुफ्फुसात साचलेले पाणीही काढून टाकले गेले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
3/7
हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाच्या या फोटोंमध्ये दिलीप कुमार डोळे मिटून खाली झोपलेले दिसत आहेत. तर, पत्नी सायरा बानो पती दिलीप कुमार यांचे चुंबन घेताना दिसल्या, तर कधी त्या काळजीत दिसल्या.
4/7
यासह सायरा यांनी दिलीपकुमार यांच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे चाहत्यांचे आभार मानले आहेत आणि पुढे देखील प्रार्थना करण्यास सांगितले आहे.
5/7
यापूर्वी, सोमवार 7 जून 2021 रोजी संध्याकाळी रुग्णालयातून दिलीप कुमार यांचा फोटोही चाहत्यांसमोर आला होता. तेव्हापासून चाहते सतत अभिनेत्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत होते.
6/7
दिलीप कुमार हे ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकीर्दीतील एकपेक्षा एक सुपर हिट चित्रपटात काम केले आहे. ते बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे.
7/7
त्यांच्या पत्नी सायरा बानो या बहुतेकदा दिलीप कुमार यांचे फोटो शेअर करत असतात. त्याचवेळी अभिनेता शाहरुख खान देखील रोज दिलीप कुमार यांची भेट घेत राहतो. असं म्हणतात की, दिलीप कुमार शाहरुखला आपला मुलगा मानतात.