अनुराग कश्यपच्या ‘दो बारा’मध्ये तापसी पन्नू झळकणार !

अनुराग कश्यपच्या 'दो बारा'मध्ये तापसी पन्नू झळकणार !

चित्रपट निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu) पुन्हा एकदासोबत चित्रपटात काम करणार आहेत.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 13, 2021 | 10:02 AM

मुंबई : चित्रपट निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu) पुन्हा एकदासोबत चित्रपटात काम करणार आहेत. यापूर्वी ‘मनमर्जियां’ हा चित्रपट त्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा त्यांची जोडी एकत्र येणार आहे. ‘दो बारा’ (Do Baaraa) हा थ्रिलर चित्रपट असेल. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून त्याचा टीझर व्हिडिओ यापूर्वीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Taapsee Pannu will be seen in Anurag Kashyap’s ‘Do Baaraa’ movie)

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

टीझरमध्ये तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना अनुराग कश्यप म्हणाले की, ‘दो बारा’ बरोबरची आमची दृष्टी प्रेक्षकांसमोर नवीन स्टोरी सादर करण्याची आहे आणि त्यासाठी मी खूप उत्साही आहे. मी तापसीबरोबर काम करण्याची ही दुसरी वेळ आहे आणि यावेळी एक थ्रिलर चित्रपट असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

या चित्रपटाविषयी बोलताना तापसी म्हणाली, ‘हा एक थ्रिलर असणार आहे. माझ्या कारकिर्दीत आतापर्यंत थ्रिलर चित्रपटांच्या बाबतीत मी खूप भाग्यवान ठरले आहे आणि मला असे चित्रपट करायला आवडतात. हा चित्रपट वेगळा असणार आहे कारण अनुराग कश्यप सारख्या दिग्दर्शकांकडून दिग्दर्शित होणार आहे.

अनुरागच्या दिग्दर्शनाखाली मी दुसऱ्यांदा काम करत आहे. अनुराग कश्यप अखेर विक्रमदित्य मोटवानी दिग्दर्शित अनिल कपूरच्या विरुद्ध ‘AK Vs AK’ चित्रपटात दिसले.

संबंधित बातम्या : 

…आणि प्रियांका चोप्रा ॲमेझॉनवर ठरली Best Seller, भारतासह UK आणि US ‘या’ पुस्तकाची धमाल

कोरोनाने मदतीचं महत्त्व शिकवलं म्हणत अर्जुन 100 कॅन्सरग्रस्तांना मदत करणार !

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

(Taapsee Pannu will be seen in Anurag Kashyap’s ‘Do Baaraa’ movie)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें