‘बाहुबली’ सुपरस्टार प्रभासचा 25वा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, लवकरच होणार मोठी घोषणा!

सुपरस्टार प्रभास (Prabhas) आपल्या 25व्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे, जी त्याच्या ग्लोबल फॅनबेससाठी खूपच आनंदाची गोष्ट असणार आहे.

‘बाहुबली’ सुपरस्टार प्रभासचा 25वा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, लवकरच होणार मोठी घोषणा!
प्रभास ठरला चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता

मुंबई : मायथोलॉजीपासून अ‍ॅक्शन एंटरटेनरपर्यंत, रोम-कॉमपासून सायन्स फिक्शनपर्यंत, सुपरस्टार प्रभास दरवर्षी काही नवे घेऊन येत असतो आणि आता हाच इतिहास पुन्हा एकदा रिपीट होण्यासाठी तयार आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas) आपल्या 25व्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे, जी त्याच्या ग्लोबल फॅनबेससाठी खूपच आनंदाची गोष्ट असणार आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “प्रभास25 निश्चितपणे अद्भुत असेल आणि सुपरस्टार लवकरच एक विशेष घोषणा करणार आहे. चित्रपटाविषयीची माहिती गोपनीय ठेवण्यात आली असली तरीही, आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे, ती अशी की चित्रपटाचे कथानक त्याच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत पूर्णत: वेगळे आहे.”

25वा चित्रपट असणार आणखी धमाकेदार!

ग्रेपवाइनच्या मतानुसार, चित्रपटात प्रभास आधी कधीही न दिसलेल्या भूमिकेत दिसणार असून एक कल्टचा दर्जा असलेल्या ब्लॉकबस्टर अशा दिग्दर्शकासोबत काम करत आहे. भारतीय चित्रपट उद्योगात सुपरस्टार पदाला पोहोचल्यानंतर साधारणपणे स्टार्स टाइपकास्ट होऊन जातात मात्र, खासकरून तसे जसे चाहत्यांना अपेक्षित असतात मात्र, हे काहीतरी अनोखे आणि नवे असेल, याची आम्हाला खात्री आहे.

भारतीय सुपरस्टार प्रभास एक घराघरांत पोहोचलेले नाव बनले असून, आता तो त्याच्या 25व्या चित्रपटामध्ये  एका वेगळ्या लेव्हलच्या एलेक्टरीफाइंग परफॉर्मेंसमध्ये दिसणार आहे. जगभरातील प्रभासचे चाहते 7 ऑक्टोबर 2021ला त्याच्या 25व्या चित्रपटाची घोषणा ऐकून आनंदित होतील, ज्याची ते खूप आतुरतेने वाट पहात आहेत.

‘राधे श्याम’ची उत्सुकता

सुपरस्टार प्रभास (Prabhas) याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. प्रभास लवकरच ‘राधे श्याम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) प्रभासबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राधा कृष्ण कुमार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा एक रोमँटिक चित्रपट असणार आहे. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. प्रभासने आतापर्यंत अनेक रोमँटिक आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि, त्याची रोमँटिक शैली चाहत्यांना अधिक आवडते.

राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरणार

प्रसिद्ध दिग्दर्शिक राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटातील ही एक बहुभाषिक प्रेमकथा 1970 मध्ये युरोपमध्ये घडते. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत झालेला हा चित्रपट आहे. सोबतच अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सनं सज्ज राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरणार आहे, यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपात दिसणार आहेत.

हेही वाचा :

TMKOC | कधीकाळी तीन रुपयांसाठी तासन् तास राबायचे, ‘नट्टू काकां’च्या भूमिकेने बदललं होतं घनश्याम नायक यांचं आयुष्य!

‘ती वाचेल असं वाटलं नव्हतं…’, आर्यनच्या जन्मावेळी गौरीची अवस्था बघून घाबरला होता शाहरुख खान!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI