AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाणे म्हणणे सुरू असतानाच ‘या’ गायकाने घेतला जगाचा निरोप, वाचा काय घडले?

ओडिशामध्ये दुर्गापूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येते. दुर्गापूजेत गाणे म्हणताना मुरली महापात्रा यांचे निधन झाल्याने परिसरात शोक पसरलाय.

गाणे म्हणणे सुरू असतानाच 'या' गायकाने घेतला जगाचा निरोप, वाचा काय घडले?
| Updated on: Oct 04, 2022 | 8:06 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध गायक मुरली महापात्रा (Murali Mohapatra) यांचे निधन झालय. ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात दुर्गापूजेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर गाणे म्हणत असतानाच त्यांचा जीव गेलाय. या घटनेनंतर कोरापुट जिल्ह्यात दु: खाचे वातावरण बघायला मिळतंय. मुरली महापात्रा यांच्या निधनाची (Passed away) माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिलीये. ओडिशामध्ये दुर्गापूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे (Program) आयोजन करण्यात येते. दुर्गापूजेत गाणे म्हणताना मुरली महापात्रा यांचे निधन झाल्याने परिसरात शोक पसरलाय.

अशी माहिती मिळत आहे की, मुरली महापात्रा यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठिक नव्हती. त्यामध्येच त्यांनी जेयपोरमध्ये दुर्गापूजेच्या कार्यक्रमात गाणे गायले आणि स्टेजवर असलेल्या खूर्चीवर बसायला जात असतानाच ते खाली पडले. त्यानंतर त्यांना लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मुरली महापात्रा यांच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळलाय.

हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गाणे झाल्यानंतर ते खूर्चीकडे जात असतानाच त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि रूग्णालयात नेण्याच्या अगोदरच त्यांचा जीव गेल्याचे देखील सांगण्यात येतंय. मुरली महापात्रा यांच्या निधनाची माहिती त्यांचे बंधू बिभूती प्रसाद महापात्रा यांनी दिलीये.

Follow Us
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत