AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Throwback | कतरिना कैफला बांधायची होती अक्षय कुमारला राखी, इच्छा व्यक्त करताच अभिनेता म्हणाला..

अक्षय आणि कतरिनाला पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांना खूप आवडते. हेच कारण आहे की, चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने प्रतीक्षा करतात. पण, तुम्हाला हे माहिती आहे का, की पडद्यावर जरी ही जोडी रोमान्स करत असली तरी कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची होती...

Throwback | कतरिना कैफला बांधायची होती अक्षय कुमारला राखी, इच्छा व्यक्त करताच अभिनेता म्हणाला..
कतरिना कैफ-अक्षय कुमार
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 8:46 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांची जोडी चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जाते. सोनाक्षी सिन्हा-शाहिद कपूरपासून ते कतरिना कैफ (Katrina Kaif)-अक्षय कुमारपर्यंत (Akshay Kumar) अनेक जोड्यांचा या यादीत समावेश आहे. अक्षय आणि कतरिनाला पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांना खूप आवडते. हेच कारण आहे की, चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने प्रतीक्षा करतात. पण, तुम्हाला हे माहिती आहे का, की पडद्यावर जरी ही जोडी रोमान्स करत असली तरी कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची होती (Throwback things when Katrina Kaif wants to tie a rakhi to Akshay kumar).

अक्षय आणि कतरिनाने स्क्रीनवर आपल्या रोमान्सने अनेकांना वेड लावले आहे. पण पडद्यामागे या दोघांनीही एकमेकांचे खूप मस्करी केली आहे. अशा परिस्थितीत अलीकडेच एक असा किस्सा समोर आला आहे की, कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची होती. मात्र, तिची ही इच्छा अपुरीच राहिली.

कतरिनाला बांधायची होती राखी

2016मध्ये कतरिना कैफ करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये पोहोचली होती. यावेळी गप्पा मारताना कतरिनाने चाहत्यांना एक गमतीदार गोष्ट सांगितली होती. ‘तीस मार खान’ या चित्रपटाचे प्रसिद्ध गाणे ‘शीला की जवानी’चे शूटिंग करत असताना, तिला खिलाडी कुमारांला राखी बांधायची होती. हे तिने अक्षयला सांगितले देखील होते. पण अभिनेता त्यासाठी तयार नव्हता.

अक्षयचे उत्तर…

कतरिना कैफ म्हणाली की, त्यावेळी मी ज्या व्यक्तीचा आदर करेन आणि एक चांगला मित्र बनेल, अशा व्यक्तीचा शोध घेत होते. मग, मी अक्षयला विचारले की, मी तुला राखी बांधू शकतो? हे ऐकल्यानंतर अक्षयने म्हटलं होतं की, ‘कतरिना, तुम्हाला थप्पड हवी आहे का?’ अर्जुन कपूरलाही राखी बांधण्याची माझी इच्छा असल्याचे अभिनेत्रीने यावेळी सांगितले होते, पण अर्जुननेही कतरिना कैफला नकार दिला.

अक्षय आणि कतरिनाची हिट जोडी

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांनी बर्‍याच उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोन्ही स्टार्सनी ‘हमको दीवाना कर गये’, ‘नमस्ते लंडन’, ‘सिंग इज किंग’, ‘तीस मार खान’, ‘दे दना दन’, ‘वेलकम’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत एकत्र काम केले आहे. आता जवळपास 10 वर्षांनंतर अक्षय-कतरिना ही जोडी पुन्हा ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन वर्षभरापासून लटकले आहे. हा चित्रपट आता 15 ऑगस्टच्या सुमारास रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे.

(Throwback things when Katrina Kaif wants to tie a rakhi to Akshay Kumar)

हेही वाचा :

Good News | ‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटोकडे ‘गोड बातमी’, सोशल मीडियावर बेबी बंप दाखवत शेअर केला आनंद!

Photo : अभिनेते विजय वर्मा यांच्या स्वप्नात आला ‘हा’ व्यक्ती, इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली माहिती

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.