खतरनाक स्टंट करत टायगर श्रॉफने मारली पूलमध्ये उडी, सोशल मीडियावर video चर्चेत!

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या स्टंटसाठीही ओळखला जातो. त्याच्या या कूल लूकचे कौतुक करून चाहते अजिबात थकत नाही.

खतरनाक स्टंट करत टायगर श्रॉफने मारली पूलमध्ये उडी, सोशल मीडियावर video चर्चेत!
टायगर श्रॉफ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या स्टंटसाठीही ओळखला जातो. त्याच्या या कूल लूकचे कौतुक करून चाहते अजिबात थकत नाही. टायगर त्याच्या फिटनेसवर किती कठोर परिश्रम करतो याबद्दल त्याच्या चाहत्यांना खडान् खडा माहिती असते. गेल्या काही काळात त्याच्या जिम आणि स्टंटचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचवेळी अभिनेत्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ मालदीवमध्ये चित्रित करण्यात आला आहे (Tiger Shroff pool diving Stunt Video goes viral on internet).

या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की, तो जलतरण तलावात स्टंट करताना डाईव्ह्ज करताना दिसत आहेत. हा स्टंट पाहून चाहते या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही खूप प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ आपली पिळदार बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

या व्हिडिओमध्ये तो जलतरण तलावात उडी मारताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत. टायगर श्रॉफचा हा जबरदस्त स्टंट आणि स्विमिंग पूलमध्ये डायव्हिंग करणे त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. चाहत्यांसह अनेक सेलेब्रिटीजही टायगरच्या या व्हिडीओचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ आपली पिळदार बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. त्याच्या या शैलीचे लोक वेडे झाले आहेत. टायगर श्रॉफ, मैत्रीण-अभिनेत्री दिशा पाटनीसमवेत मालदीवमध्ये गेला होता. त्याचबरोबर चाहते आता या दोघांसह फोटोची आतुरतेने वाट पाहत आहेत. शनिवारी मुंबई विमानतळावर टायगर श्रॉफ आणि दिशा मालदीवहून परतताना स्पॉट झाले होते (Tiger Shroff pool diving Stunt Video goes viral on internet).

‘गणपत’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना तो लवकरच ‘गणपत’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये कृती सेनॉन त्याच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानी, पूजा एंटरटेनमेंट आणि गुड कंपनी सह-निर्मित आहेत. हे दोन्ही स्टार दुसऱ्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. याआधीही दोघे ‘हीरोपंती’मध्ये एकत्र दिसले आहेत. त्याचबरोबर अभिनेत्याचा दुसरा चित्रपट ‘हीरोपंती 2’ देखील जाहीर झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया झळकणार आहे.

(Tiger Shroff pool diving Stunt Video goes viral on internet)

हेही वाचा :

Free Corona Help | सोनू सूदने सुरू केली ‘फ्री कोरोना टेस्ट’ स्कीम, अशा प्रकारे करणार लोकांना मदत

Allu Arjun | दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI