AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Allu Arjun | दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनंतर आता तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun)  देखील कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी त्याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.

Allu Arjun | दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
अल्लू अर्जुन
| Updated on: Apr 28, 2021 | 12:45 PM
Share

मुंबई : या क्षणी भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत दररोज कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण होत असून, हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. आता अनेक सेलिब्रिटीही या प्राणघातक विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनंतर आता तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun)  देखील कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी त्याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली (South Superstar Allu Arjun tested corona positive).

अभिनेता अल्लूने हा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं, ‘सर्वांना नमस्कार, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती करतो की, त्यांनी देखील आपापली चाचणी करून घ्यावी. घरी रहा, सुरक्षित रहा आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा लस टोचून घ्या. मी माझ्या सर्व हितचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, काळजी करू नका कारण मी ठीक आहे. ‘

पाहा अल्लू अर्जुनची पोस्ट

(South Superstar Allu Arjun tested corona positive)

नुकताच मालदीववरून परतला होता अभिनेता

अल्लू अर्जुन काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत सुट्टी घालवण्यासाठी मालदीवमध्ये गेला होता. यानंतर तो आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या आगामी ‘पुष्पा’ चित्रपटाचा टीझरही रिलीज केला होता, जो त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता (South Superstar Allu Arjun tested corona positive).

चाहते पडले काळजीत!

सुपरस्टार अल्लू अर्जुनने ही माहिती देताच त्याचे चाहते खूप काळजीत पडले आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. त्याला लवकर बरे वाटावे म्हणून त्याचे इंडस्ट्रीमधले मित्र-मंडळी आणि चाहते शुभेच्छा देत आहेत.

अल्लूची कारकीर्द

दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने 2003 मध्ये ‘गंगोत्री’ चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून पदार्पण केले. अर्जुनने ‘फिल्मफेअर’ आणि ‘नंदी’ पुरस्कार जिंकले आहेत. त्याने मनोरंजन विश्वाला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अल्लू अर्जुनचे स्नेहा रेड्डीशी लग्न झाले आहे. अल्लू आणि स्नेहाचे 6 मार्च 2011 रोजी लग्न झाले. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.

(South Superstar Allu Arjun tested corona positive)

हेही वाचा :

COVID 19 Helping Hand | आयुष्मान खुरानाकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत, कोरोना काळात चाहत्यांनाही केले मदतीचे आवाहन!

Happy Birthday Samantha Akkineni | साडीपासून ते कॅज्युअलपर्यंत, चाहत्यांना आवडतात समंथा अक्किनेनीच्या अदा

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.