Free Corona Help | सोनू सूदने सुरू केली ‘फ्री कोरोना टेस्ट’ स्कीम, अशा प्रकारे करणार लोकांना मदत

आता सोनूच्या पुढाकाराने गरजू लोकांच्या कोरोना चाचण्या विनामूल्य केल्या जाणार आहेत. सोनूने नुकतीच ट्विटरद्वारे याची घोषणा केली आहे.

Free Corona Help | सोनू सूदने सुरू केली ‘फ्री कोरोना टेस्ट’ स्कीम, अशा प्रकारे करणार लोकांना मदत
सोनू सूद

मुंबई : कोरोनामुळे डॉक्टरांवर येत असलेला ताण आणि कोरोना चाचणी केलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सोनू सूद (Sonu Sood) यांनी पुन्हा एकदा एका नव्या पद्धतीत पुढाकार घेतला आहे. आता सोनूच्या पुढाकाराने गरजू लोकांच्या कोरोना चाचण्या विनामूल्य केल्या जाणार आहेत. सोनूने नुकतीच ट्विटरद्वारे याची घोषणा केली आहे (Bollywood Actor Sonu Sood give Free Corona Help with free corona test).

सोनू सूद कोरोना कालावधीमध्ये लोकांना सतत मदत करत आहे. नुकताच त्याने स्वत:देखील कोरोनाला पराभूत केले आहे. यासाठी त्यांनी दोन संस्थांशी हातमिळवणी केली आहे. यातील एकाचे नाव आहे ‘हेलवेल 24’ आणि दुसरे नाव आहे ‘क्रॅस्ना डायग्नोस्टिक्स’.

पाहा सोनूचे ट्विट

कोरोनाची दुसरी लाट भयावह

सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात खूप हाहाकार माजला आहे. प्रत्येक लोकांना घरात खूप त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्याला तपासणी करण्यात समस्या येत आहे, तर कोणाला वेळेवर औषध मिळत नाहीयत. दुसरीकडे कोणी रुग्णालयात बेडसाठी झगडत आहे, तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बरेच लोक तडफडून मरत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट भारतात अधिक विनाशकारी असल्याचे दिसून येते आहे.

आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. सगळीकडे खूप ओरड सुरु आहे. अशा परिस्थितीत लोक एकमेकांना मदत करत आहेत आणि संस्था देखील मदतीसाठी पुढे येत आहेत. सोनू सूद यांची संस्थादेखील यापैकीच एक आहे. अभिनेता सोनू सूद यांनी सूद फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थेची स्थापना केली आहे. मार्च 2020 पासून सोनूने स्वत: ला पूर्णपणे समाजसेवेत झोकून दिले आहे आणि ते सर्व प्रकारे सर्वतोपरी मदत करण्यास तो तयार आहेत (Bollywood Actor Sonu Sood give Free Corona Help with free corona test).

सोनू बनला ‘नायक’

लोक कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत, काम मिळत नाही, एखाद्याला शस्त्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे किंवा एखाद्यास त्यांच्या व्यवसायात मदतीची आवश्यकता आहे. असे गरजू लोक सोनू सूदकडे ऑनलाईन मदतीसाठी विचारणा करतात आणि सोनू लगेचच त्यांच्या मदतीला धावून जातो. सोनूच्या उदारपणाची चर्चा आता जगभरात होत आहे. तो आता भारतीय माध्यमांमध्ये खऱ्या अर्थाने ‘नायक’ बनला आहे. अमेरिकन टीव्ही वृत्तवाहिनी सीएनएनने अलीकडेच त्याचे हे सगळं काम कव्हर केले होते.

या समाजसेवेमुळे सोनूने संपूर्ण जगात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. करिअर व्यतिरिक्त सोनूने या कामासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. म्हणून, आता प्रत्येकाने त्यांना गांभीर्याने घेणे सुरू केले आहे. एका वर्षात सोनूने आपली संपूर्ण इमेज बदलली आहे. त्याचे नाव आता सर्वात मोठ्या नायकांमध्ये सन्मानाने घेतले जाते. हा त्याच्या प्रामाणिकपणाचा आणि निष्ठेचा परिणाम आहे.

(Bollywood Actor Sonu Sood give Free Corona Help with free corona test)

हेही वाचा :

Allu Arjun | दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

COVID 19 Helping Hand | आयुष्मान खुरानाकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत, कोरोना काळात चाहत्यांनाही केले मदतीचे आवाहन!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI