AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special | असं काय कारण होतं की ज्यामुळे नाना पाटेकर आपल्या पहिल्या मुलापासून दूर राहात! 

आज 1 जानेवारी नाना पाटेकर यांचा वाढदिवस नाना आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Birthday Special | असं काय कारण होतं की ज्यामुळे नाना पाटेकर आपल्या पहिल्या मुलापासून दूर राहात! 
| Updated on: Jan 01, 2021 | 9:46 AM
Share

मुंबई : आज 1 जानेवारी नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा वाढदिवस नाना आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्याच्या चित्रपटांचे अनेक संवाद आजही लोकांना आठवतात. आज नाना पाटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत. हा किस्सा त्यांच्या पहिल्या मुलाशी संबंधित आहे. खरंतर असे म्हटले जाते की, एक काळ असा होता की, नाना आपल्या पहिल्या मुलापासून खूप दूर राहात होते. मात्र, त्याचे नेमके कारण काय होते हे आपण पाहूयात. (Today is Nana Patekar’s 70th birthday)

मीडिया रिपोर्टनुसार नानाच्या पहिल्या मुलाच्या शरीरामध्ये काही दोष होते. जन्मताच त्याचा ओठ कापलेला होता, त्यामुळे नाना खूप निराश झाले होते. त्यांची पत्नी आई असल्यामुळे ती मुलापासून दुर राहु शकली नाही. मात्र, मुलांपासून नाना दुर राहण्याचा प्रयत्न करत होते. असे म्हणतात की, त्यांनी आपल्या मुलाला खायला घातले नाही, किंवा त्यांच्या जवळही कधी बसले नाहीत. एक दिवस असे काहीतरी घडले की स्वतः नानासुद्धा आपल्या मुलापासून लांब राहू शकले नाही.

रिपोर्टनुसार, एक दिवस नाना आणि त्याचा मुलगा घरी एकटे होते. त्यादिवशी असे काहीतरी घडले आणि त्यादिवशापासून नाना आपल्या मुलापासून दूर राहु शकले नाहीत. त्यांची निराशा तेथेच संपली मात्र, त्यानंतर काही दिवसात त्यांच्या मुलांची तब्येत बिघडत गेली आणि त्याच्यावर बरेच उपचार करण्यात आले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही आणि तो जगाला निरोप देऊन गेला त्यानंतर मुलाच्या मृत्यूने नाना हादरले ते तुटले होते. मग काही काळानंतर त्यांच्या पत्नीने दुसर्‍या मुलाला जन्म दिला, त्यानंतर नाना पाटेकर पुन्हा आनंदी झाले.

संबंधित बातम्या : 

Nana Patekar | नाना पाटेकर सुशांत सिंहच्या पाटण्याच्या घरी, वडिलांचे सांत्वन करताना भावूक

(Today is Nana Patekar’s 70th birthday)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.