Vicky Kaushal  | विकी कौशल साकारणार ‘सॅम मानेकशॉ’, पुन्हा एकदा दिसणार जबरदस्त ‘आर्मी’ लूक!

सॅम मानेकशॉ यांच्या जयंतीनिमित्ताने या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सॅम हे भारतातील वीर सैनिकांपैकी एक होते. या चित्रपटात विकी कौशल सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Vicky Kaushal  | विकी कौशल साकारणार ‘सॅम मानेकशॉ’, पुन्हा एकदा दिसणार जबरदस्त ‘आर्मी’ लूक!
विकी कौशल
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 4:13 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal ) त्याच्या जबरदस्त अभिनयामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचा ‘उरी’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विकी कौशलला ‘उरी’साठी राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झाला. विकी कौशल नेहमीच स्वत:साठी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट निवडतो. आता विकी कौशलच्या आगामी ‘सॅम मानेकशॉ’ (Sam Manekshaw ) या बायोपिककडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतेच या चित्रपटाचे शीर्षक निश्चित करण्यात आले आहे (Vicky Kaushal  announce the title of Sam Manekshaw biopic sam bahadur).

देशाची शान म्हणून नावाजलेल्या ‘सॅम मानेकशॉ’ यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या बायोपिकचे नाव जाहीर करण्यात आले आहे. विकी कौशल स्टारर रॉनी स्क्रूवाला आणि मेघना गुलजार दिग्दर्शित या बायोपिकला ‘सॅम बहादूर’ असे नाव देण्यात आले आहे.

विकीचा नवीन चित्रपट

सॅम मानेकशॉ यांच्या जयंतीनिमित्ताने या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सॅम हे भारतातील वीर सैनिकांपैकी एक होते. या चित्रपटात विकी कौशल सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सॅम बहादूर’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहेत.

विकी कौशलने या चित्रपटाविषयी माहिती देणारा शीर्षक व्हिडीओ शेअर केला आहे. विकी कौशलच्या या भूमिकेवर चाहत्यांची नजर स्थिरावली आहे. विकीने बऱ्याच दिवसांपूर्वी या चित्रपटातील आपला लूक चाहत्यांसमोर सादर केला होता. विकीच्या त्या खास लूकने सर्वांना त्याच्याकडे आकर्षित केले होते.

विकीने शेअर केला व्हिडीओ

विकी कौशलने एक खास व्हिडीओ शेअर केला असून, त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे. व्हिडीओमध्ये भिन्न भिन्न दृश्ये दिसत आहेत. यासह, पार्श्वभूमीमध्ये एक आवाज ऐकू येतो. हा व्हिडीओ शेअर करताना खास कॅप्शनही देण्यात आले आहे (Vicky Kaushal  announce the title of Sam Manekshaw biopic sam bahadur).

पाहा व्हिडीओ :

हा व्हिडिओ गुलजार यांनी आपल्या आवाजाने सजवला ​​आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

विकीने याबद्दल बोलताना सांगितले की, मी नेहमीच सॅम बहादुरांबद्दलच्या कथा ऐकल्या आहेत आणि त्यांनी 1971चे युद्ध पाहिले होते. पण, जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले,  अशा देशभक्ताची भूमिका साकारणे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

विकीच्या या चित्रपटाचा पहिला लूक 2019मध्ये रिलीज झाला होता, ज्यात त्याने सॅमच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. दिग्दर्शक मेघना गुलजार हा चित्रपट करत आहेत. अशा परिस्थितीत विकीला पुन्हा एकदा सैनिकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत.

(Vicky Kaushal  announce the title of Sam Manekshaw biopic sam bahadur)

हेही वाचा :

Video | बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनाया कपूरने उडवली चाहत्यांची झोप, पाहा तिचा जबरदस्त ‘बेली डान्स’

Video | कश्मीरा शाहचं बॉडी ट्रान्सफॉरमेशन, ब्लू बिकिनीत दिसला ग्लॅमरस अंदाज, पाहा व्हिडीओ…

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.