Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | विकी-कतरिनाच्या लग्नाआधी सवाई माधोपुरमध्ये मोठी बैठक, कायदा आणि सुव्यवस्थेवर होणार चर्चा!

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या चर्चेचा भाग बनले आहेत. दोघे राजस्थानमध्ये 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. हा दिवस खास करण्यासाठी दोघेही जोरदार तयारी करत आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे फंक्शन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, या लग्नापूर्वी सवाई माधोपूरच्या डीएमने बैठक बोलावली आहे.

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | विकी-कतरिनाच्या लग्नाआधी सवाई माधोपुरमध्ये मोठी बैठक, कायदा आणि सुव्यवस्थेवर होणार चर्चा!
Vicky Kaushal-Katrina Kaif

मुंबई : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या चर्चेचा भाग बनले आहेत. दोघे राजस्थानमध्ये 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. हा दिवस खास करण्यासाठी दोघेही जोरदार तयारी करत आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे फंक्शन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, या लग्नापूर्वी सवाई माधोपूरच्या डीएमने बैठक बोलावली आहे.

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत सवाई माधोपूरच्या डीएमने 3 डिसेंबरला बैठक आयोजित केली आहे. ज्यामध्ये गर्दी नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्थेसह सर्व परिस्थितीचे मूल्यांकन केले जाईल. ही बैठक शुक्रवारी पार पडणार आहे. कतरिना आणि विकी 9 डिसेंबरला सात फेरे घेणार आहेत, पण त्या आधी विकी आणि कतरिना कोर्ट मॅरेज करणार आहेत. हा विवाह विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत होणार आहे.

आधी कोर्ट मॅरेज करणार!

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत विवाहाची नोंदणी व्हावी, अशी दोघांची इच्छा आहे. रिपोर्टनुसार कोर्ट मॅरेज दरम्यान तीन साक्षीदार हजर राहणार आहेत. लग्नाची नोंदणी केल्यानंतर विकी आणि कतरिना राजस्थानला रवाना होतील. जिथे लग्नाची फंक्शन्स पूर्ण होणार आहेत.

लग्नात ‘नो फोन’ नियम!

बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येणार आहेत. अतिथींच्या प्रवेशासाठी एक विशेष सिक्रेट कोड देण्यात आला आहे. यासोबतच लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ लीक होऊ नयेत, म्हणून लग्नात फोन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. विकी आणि कतरिनाने ज्याप्रकारे त्यांचे नाते गुपित ठेवले होते, तसेच त्यांना त्यांचे लग्न जगाच्या नजरेपासून दूर ठेवायचे आहे.

सलमान खानला निमंत्रण नाही!

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कतरिना कैफने सलमान खानच्या कुटुंबीयांना औपचारिक निमंत्रण पाठवलेले नाही. तसेच, त्याच्या दोन बहिणी अर्पिता आणि अलविरा यांनाही कार्ड पाठवलेले नाही. सलमानची बहीण अर्पिताला लग्नपत्रिकेबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, मला कोणतीही आमंत्रण पत्रिका मिळालेली नाही.

‘हे’ सेलिब्रिटी होणार सहभागी

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, करण जोहर, रोहित शेट्टी, वरुण धवन, नताशा दलाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. अलीकडेच विकी कौशल कतरिना कैफच्या घराबाहेर स्पॉट झाला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना हवा मिळाली आहे.

हेही वाचा :

Money Heist Season 5 Part 2 | Alicia गेम चेंजर ठरणार की प्रोफेसर पुन्हा एकदा मात देणार? ‘मनी हाईस्ट’च्या शेवटच्या भागात काय घडणार?

Happy Birthday Konkona Sen Sharma | लग्नाआधीच आई होण्याची चाहूल, तब्बल 10 वर्षांनंतर कोंकणा सेन शर्माने मोडला संसार!


Published On - 11:07 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI