Katrina Kaif Mehndi Ceremony | 20 दिवसांत तयार सेंद्रिय मेहंदी, गायक गुरुदास मानच्या गाण्यासह कतरिनाच्या हातावर सजला हीनाचा रंग!

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाआधी होणाऱ्या मेंहंदी समारंभासाठी (Mehndi Ceremony) सुमारे 20 किलो सेंद्रिय मेंहंदी पुरवण्यात आली आहे. मंगळवारपासून विकी-कतरिनाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

Katrina Kaif Mehndi Ceremony | 20 दिवसांत तयार सेंद्रिय मेहंदी, गायक गुरुदास मानच्या गाण्यासह कतरिनाच्या हातावर सजला हीनाचा रंग!
विकी कौशल, कतरिना कैफ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाआधी होणाऱ्या मेंहंदी समारंभासाठी (Mehndi Ceremony) सुमारे 20 किलो सेंद्रिय मेंहंदी पुरवण्यात आली आहे. मंगळवारपासून विकी-कतरिनाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. दोन्ही अभिनेत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच मौन बाळगले असले तरी, माध्यम सूत्रांचे म्हणणे आहे की, लग्नाचे विधी 7 ते 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. या सोहळ्याची सुरुवात संगीत आणि मेहंदीने होईल आणि त्यानंतर लग्न विधी होईल.

सोजतची मेहंदी सप्रेम भेट!

सोजत आधारित मेहंदी प्रक्रिया आणि उत्पादन कंपनी ‘नॅचरल हर्बल’ चे मालक नितेश अग्रवाल म्हणाले की, ‘आम्ही लग्न समारंभासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला सेंद्रिय मेहंदीचा पुरवठा केला आहे. आम्ही ही मेहंदी मोफत दिली आहे आणि ही पालीच्या सोजतची विकी-कतरिनासाठी खास भेट आहे.’

सेंद्रिय मेहंदी तयार करण्यासाठी किती दिवस लागले?

सोजतची ही प्रसिद्ध मेहंदी तयार करण्यासाठी तब्बल 20 दिवस लागले आहेत. विकी-कतरिनाचे हे लग्न 7 ते 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हा लग्न सोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील हॉटेल सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा येथे होत आहे. पंजाबी गायक गुरुदास मान यांच्या ‘आवो नीलावो शगना दी मेहंदी’ या गाण्यासह कतरिनाच्या हातावर मेहंदी रचण्यात आली आहे. मुंबईतील मेहंदी कलाकार बिना नागदा यांनी कतरिना कैफच्या हातावर मेहंदी लावली. बिना यांनी आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सच्या हातांवर मेहंदी लावली आहे.

सेलिब्रिटींची मांदियाळी!

लग्नात सहभागी होण्यासाठी कैफची आई, बहिणी आणि भाऊ यांच्यासह इतर सदस्य लंडनहून राजस्थानला आले आहेत. तत्पूर्वी, कतरिना आणि विकी आपल्या कुटुंबीयांसह सोमवारी रात्री जयपूरला पोहोचले होते. त्यानंतर ते 15हून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह सवाई माधोपूर येथील लग्न समारंभाच्या ठिकाणी ते रवाना झाले होते.

जयपूर विमानतळ आणि हॉटेलमधील अंतर सुमारे 120 किमी आहे. चित्रपट निर्माते कबीर खान आणि त्यांची पत्नी मिनी माथूर, ‘धूम 3′ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य, ‘बंटी और बबली 2’ अभिनेत्री शर्वरी वाघ, नेहा धुपिया आणि अंगद बेदी हे लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी जोधपूरला रवाना झाले आहेत. या पाहुण्यांसाठी देखील खास मेहंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. कतरिनाच्या 20 किलो हर्बल मेहंदीसह आणखी 400 मेहंदी कोन देखील ऑर्डर करण्यात आले होते.

हेही वाचा :

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम


Published On - 10:28 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI