विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात सलमान खानचा बॉडीगार्डवर देणार सुरक्षा

रिपोर्ट्सनुसार, सलमान खान, रणबीर कपूर यांना या लग्नाचे आमंत्रण मिळालेले नाही. कतरिना कैफला तिच्या दोन्ही कथित बॉयफ्रेंडला तिच्या लग्नात आमंत्रित करायचे नाही. इतकेच नाही तर विक्की कौशलने त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिलाही या लग्नात आमंत्रित केलेले नाही.

विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात सलमान खानचा बॉडीगार्डवर देणार सुरक्षा
विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात सलमान खानचा बॉडीगार्डवर देणार सुरक्षा

मुंबई : विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. दोघांचे कुटुंबीय आज (सोमवारी) राजस्थानला रवाना होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या लग्नाची मोठी गोष्ट म्हणजे अभिनेता सलमान खान(Salman Khan)चा बॉडीगार्ड शेराच्या टीमने विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नात सुरक्षा व्यवस्था हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.

मीडिया वृत्तानुसार, सलमान खानला लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले नसले तरी, त्याचा वैयक्तिक अंगरक्षक शेरा, टायगर सिक्युरिटीची सुरक्षा टीम सिक्स सेन्स फोर्टवर या हाय प्रोफाईल लग्नाच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे. तत्पूर्वी, लग्नस्थळी सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. सवाई माधोपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली होती. यासंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रही व्हायरल झाले आहे.

माजी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला आमंत्रण नाही

विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांचे लग्न खाजगी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. रिपोर्टनुसार, यासाठी जोडप्याकडून काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत, ज्यामध्ये फोटो काढण्यास मनाई आहे, सोशल मीडियावर फोटो शेअर करू नका, ठिकाण सोडण्यापूर्वी कोणाशीही माहिती शेअर करू नका, अशा अनेक गोष्टी विवाहाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

तसेच, लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांबद्दल, यापूर्वी अशी बातमी आली होती की या जोडप्याच्या बाजूने सलमान खानला देखील आमंत्रित केले जाईल. मात्र, आता समोर आलेल्या बातमीनुसार, विकी आणि कतरिनाने त्यांच्या एक्स बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला लग्नासाठी आमंत्रित करणार नाही, असे ठरवले आहे.

रिपोर्ट्सनुसार, सलमान खान, रणबीर कपूर यांना या लग्नाचे आमंत्रण मिळालेले नाही. कतरिना कैफला तिच्या दोन्ही कथित बॉयफ्रेंडला तिच्या लग्नात आमंत्रित करायचे नाही. इतकेच नाही तर विक्की कौशलने त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिलाही या लग्नात आमंत्रित केलेले नाही. हरलीन आणि विकी दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. तिच्या एका मुलाखतीत हरलीनने खुलासा केला होता की तिचे आणि विकीचे ब्रेकअप झाले कारण ‘उरी’ चित्रपटाच्या यशानंतर विकी त्याच्या आयुष्यात पुढे गेला होता. (Vicky Kaushal-Katrina Kaif’s wedding security is the responsibility of Salman Khan’s bodyguard)

इतर बातम्या

Sharad Ponkshe Post | आधी आरोपांच्या फैरी झाडल्या, आता शरद पोंक्षेंची पोस्ट डिलीट, नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood | सोनू सूदच्या अडचणीत वाढ! इमारतीतील बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी BMCची नोटीस

Published On - 6:11 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI