Sardar Udham Singh Teaser: विक्की कौशल स्टारर ‘सरदार उधम सिंह’ चा टीझर रिलीज, विकी कौशल दिसला जबरदस्त लूकमध्ये

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर चाहते विकी कौशलच्या पुढच्या चित्रपटाच्या 'सरदार उधम सिंह' च्या टीझरची खूप दिवसांपासून वाट पाहत होते, ही प्रतिक्षा आज संपली आहे. (Vicky Kaushal starrer 'Sardar Udham Singh's' teaser release, Vicky Kaushal appeared in a great look)

Sardar Udham Singh Teaser: विक्की कौशल स्टारर 'सरदार उधम सिंह' चा टीझर रिलीज, विकी कौशल दिसला जबरदस्त लूकमध्ये
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 7:22 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या अतुलनीय अभिनयासाठी ओळखला जातो. तो त्याच्या आगामी शहीद उधम सिंग या चित्रपटासाठी बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. आता आज विकीच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘सरदार उधम सिंह’चा टीझर रसिकांसमोर रिलीज करण्यात आला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर चाहते विकी कौशलच्या पुढच्या चित्रपटाच्या ‘सरदार उधम सिंह’ च्या टीझरची खूप दिवसांपासून वाट पाहत होते, ही प्रतिक्षा आज संपली आहे.

कसा आहे सरदार उधम सिंहचा टीझर ?

आज, विकी कौशलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसाठी सरदार उधम सिंगचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये चाहत्यांना एका फोटोद्वारे विकी कौशलची झलक पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये एक उत्तम पार्श्वसंगीत ऐकायला येत आहे.

टीझरमध्ये दाखवलेली एकच गोष्ट म्हणजे सरदार उधम सिंह यांचा पासपोर्ट तयार केला जात आहे. चाहत्यांनी अद्याप अभिनेत्याचा लूक पूर्णपणे पाहिला नाही. टीझर शेअर करताना विकीनं लिहिलं आहे की शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त मला त्यांचे सहकारी – सरदार उधम सिंह यांच्या एका मिशनची कथा आणताना अभिमान वाटतो.

या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये हा टीझर धुमाकूळ घालतो आहे. चाहत्यांना हा टीझर खूप आवडत आहे. टीझर पाहून चाहत्यांनी आता त्यावर  प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाहा टीझर

कधी रिलीज होईल चित्रपट 

तसे, नुकतंच अशी बातमी देखील आली होती की निर्मात्यांनी शेवटी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच चित्रपट आता चित्रपटगृहांऐवजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. असं म्हटले जात आहे की निर्मात्यांनी ठरवले आहे की हा चित्रपट सरदार उधम सिंह दसऱ्याच्या वीकेंडमध्ये थिएटरऐवजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर केला जाईल. सध्या, रिलीजची तारीख 16 ऑक्टोबर सांगितली जात आहे.

या चित्रपटात विकी कौशल स्वातंत्र्य सेनानी सरदार उधम सिंह यांचे शौर्य सादर करताना दिसणार आहे. सरदार उधम सिंग यांनी 1940 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचे औचित्य साधून लंडनमध्ये मायकेल ओ’डायर (पंजाबचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर) यांना गोळ्या घातल्या.

संबंधित बातम्या

Sara Ali Khan : गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये सारा अली खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

Ananya Panday : ग्लोबल सिटीजन कॉन्सर्टमध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण भारतीय ठरली अनन्या पांडे, सामाजिक कार्याविषयी केले भाष्य

Bigg Boss Marathi 3 | एकटं फिरण्यावरही बंधन येणार, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जोडी की बेडी’चा नवा खेळ रंगणार!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.