Vikram Vedha Release Date | हृतिक रोशन आणि सैफ अली खान करणार धमाका, सुपरहिट तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार एकत्र!

अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) लवकरच एकत्र काम करणार आहेत. दोघेही सुपरहिट तमिळ फिल्म ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये एकत्र दिसणार आहेत.

Vikram Vedha Release Date | हृतिक रोशन आणि सैफ अली खान करणार धमाका, सुपरहिट तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार एकत्र!
हृतिक-सैफ
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 10, 2021 | 3:36 PM

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) लवकरच एकत्र काम करणार आहेत. दोघेही सुपरहिट तमिळ फिल्म ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये एकत्र दिसणार आहेत. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पुष्कर आणि गायत्री हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘विक्रम वेधा’ या तमिळ चित्रपटात आर माधवन आणि विजय सेथूपती मुख्य भूमिकेत होते आणि आता हिंदीमध्ये सैफ – हृतिक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 30 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे (Vikram Vedha Release Date Hritik Roshan And Saif Ali Khan will work together for movie).

याबाबत माहिती देताना व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट केले की, ‘हृतिक आणि सैफ विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसतील. तमिळ चित्रपट दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होईल. ही रिलीज तारीख योग्य आहे कारण गांधी जयंती आणि दसरा चित्रपटाच्या रिलीज तारखेच्या जवळपास आहे.’

पाहा तराण आदर्श यांचे ट्विट

यापूर्वी आमिर खान या चित्रपटात वेधाची भूमिका साकारेल अशी बातमी होती, पण नंतर असे म्हटले गेले की, आमिरने चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. आमिरने नकार दिल्यानंतर हृतिकला वेधासाठी फायनल करण्यात आले. ही बातमी किती खरी आहे, याबद्दल आता केवळ निर्मातेच सांगू शकतात.

दोघांचे आगामी प्रकल्प

हृतिक लवकरच ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शुक्रवारीच हृतिकने दीपिका आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकासमवेत एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘ही गँग टेक ऑफ करण्यास तयार आहे.’ ‘फायटर’ एक अ‍ॅक्शन थ्रिलर फिल्म असेल.

तर, दुसरीकडे सैफ अली खान ‘भूत पोलिस’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सैफ व्यतिरिक्त अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिज मुख्य भूमिकेत आहेत. अलीकडेच चित्रपटाच्या सर्व पात्रांची पोस्टर्स रिलीज करण्यात आली असून, यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 17 सप्टेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

याशिवाय सैफ आदिपुरुषात दिसणार आहे. या चित्रपटात सैफ, प्रभास आणि कृती सॅनॉन मुख्य भूमिकेत आहेत.

(Vikram Vedha Release Date Hritik Roshan And Saif Ali Khan will work together for movie)

हेही वाचा :

PHOTO | एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या रश्मिका मंदनाच्या हातात दिसला ‘छोटा पाहुणा’, पाहा क्युट फोटो

Happy Birthday Alok Nath | ऑनस्क्रीन सुनेसोबतसुद्धा जोडलं गेलं ‘संस्कारी बाबूजी’ फेम आलोक नाथांचं नाव, #MeeTooमुळेही आले होते चर्चेत!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें