Happy Birthday Alok Nath | ऑनस्क्रीन सुनेसोबतसुद्धा जोडलं गेलं ‘संस्कारी बाबूजी’ फेम आलोक नाथांचं नाव, #MeeTooमुळेही आले होते चर्चेत!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 10, 2021 | 10:54 AM

बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी मानून प्रसिद्ध असलेले अभिनेते आलोक नाथ (Alok Nath) यांचा आज वाढदिवस आहे. आलोक नाथ हे आजमितीला एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आहेत. त्यांनी गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमधील अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Happy Birthday Alok Nath | ऑनस्क्रीन सुनेसोबतसुद्धा जोडलं गेलं ‘संस्कारी बाबूजी’ फेम आलोक नाथांचं नाव, #MeeTooमुळेही आले होते चर्चेत!
आलोक नाथ

Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी मानून प्रसिद्ध असलेले अभिनेते आलोक नाथ (Alok Nath) यांचा आज वाढदिवस आहे. आलोक नाथ हे आजमितीला एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आहेत. त्यांनी गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमधील अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. बहुतेक चित्रपटात त्याने वडिलांची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांना त्यांचे काम खूप आवडले आहे. त्यांच्या चित्रपटांच्या यादीमध्ये अनेक बड्या सुपरहिट चित्रपटांची नावेही आहेत, ज्यात ‘अग्निपथ’, ‘लाडला’, ‘साजन का घर’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ हैं’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे (Happy Birthday Alok Nath when sanskari babujis name appeared in MeeToo Case).

चित्रपटांशिवाय अभिनेत्याने बर्‍याच मोठ्या मालिकांमध्येही काम केले आहे. ज्यामुळे त्याना प्रेक्षकांच्या घराघरांत प्रवेश मिळाला आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले. त्यांनी काम केलेल्या मालिकांविषयी बोलायचे तर, ते टीव्ही सिरीयल ‘रिश्ते’, ‘सपना बाबुल का… विदाई’, ‘यहा में घर घर खेली’ अशा बर्‍याच मोठ्या मालिकांमध्ये दिसले होते. याशिवाय त्यांच्या एक शोमधील सूनच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीशी त्यांचे नाव देखील जोडले गेले होते.

सूनेशीच जोडले सासऱ्याचे नाव

‘बुनीयाद’ या मालिकेत नीना गुप्ता त्यांच्या सूनेची भूमिका साकारत असत. या शोमध्ये आम्ही अभिनेता आलोक नाथ ‘हवेली राम’ची भूमिका साकारायचे. त्याचवेळी, घरातील सून रज्जोच्या भूमिकेत नीना गुप्ता दिसल्या होत्या. जरी ही जोडी या शोमध्ये सून आणि सासऱ्याची भूमिका साकारत होती, परंतु वास्तविक जीवनात दोघेही एकमेकांसोबत नात्यात होते. ही बातमी अनेक दिवस चर्चेचा विषय राहिली. पण या जोडीचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि नंतर ते दोघेही वेगळे झाले.

#MeeToo मोहिमेत आलोक नाथ यांचे नाव

#MeToo चळवळी दरम्यान जेव्हा आलोक नाथ यांचे नाव समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्यासारख्या अभिनेत्याचे नावदेखील या प्रकरणात येईल, असे कोणालाही वाटले नव्हते. निर्माती विंटा नंदाने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. ही बातमी कळताच त्यांनी स्वत:ला मीडियापासून दूर केले आणि कधीही कुणाशीही बोलले नाही. काही दिवसांनंतर अभिनेत्री दीपिका अमीननेही त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. दरम्यान, अभिनेत्री रेणुका शहाणेनेही दीपिकाचे भरपूर समर्थन केले. रेणुकाने दीपिकाला भक्कम पाठींबा दिला, ज्यामुळे आलोक याप्रकरणात आलोक पुरते अडकले होते.

(Happy Birthday Alok Nath when sanskari babujis name appeared in MeeToo Case)

हेही वाचा :

Khoya Khoya Chand | रागीट स्वभावामुळे प्रसिद्ध होती तब्बूची बहीण फराह नाझ, इंडस्ट्री सोडून आता काय करतेय?

Breakup Story | आधीच विवाहित तरीही वहीदा रेहमानच्या प्रेमात आकंठ बुडाले होते गुरुदत्त, वाचा अधुऱ्या प्रेमाची ‘अधुरी दास्ताँ’

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI