‘जे निर्णय घ्याल, त्याची जबाबदारी देखील घ्या…’, राज कुंद्राच्या जामिनानंतर शिल्पा शेट्टीची पोस्ट चर्चेत!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता राज कुंद्राचा जामीन झाल्यानंतर शिल्पाने इंस्टाग्रामवर अशी पोस्ट टाकली आहे, जी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

‘जे निर्णय घ्याल, त्याची जबाबदारी देखील घ्या...’, राज कुंद्राच्या जामिनानंतर शिल्पा शेट्टीची पोस्ट चर्चेत!
Shilpa Shetty

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता राज कुंद्राचा जामीन झाल्यानंतर शिल्पाने इंस्टाग्रामवर अशी पोस्ट टाकली आहे, जी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट प्रकरणात जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी राजची सुटका झाली आणि आता तो घरात राहत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनेक प्रेरणादायी पोस्ट टाकल्या. आता शिल्पाने पुन्हा एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे, ज्यात तिने निर्णय घेणे आणि त्याची जबाबदारी घेण्याबद्दल सांगितले आहे.

शिल्पाच्या पोस्टचा आशय

शिल्पाने एका पुस्तकाच्या पानाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात लिहिले आहे की, ‘स्वतःवर अवलंबून : अडचणींचा सामना केला, मुख्य पात्र होता, तो पडला. त्याने स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेतली आणि नंतर स्वतःचे निर्णय घेतले.’

त्यात पुढे लिहिले आहे की, ‘जे काही आपण करतो किंवा करत नाही, त्याला शेवटी आपणच जबाबदार असतो. जर आपण भाग्यवान असू तर, आपल्याला मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल, परंतु एका वेळी आपल्यालाच निर्णय घ्यावे लागतील आणि त्यासाठीची जबाबदारी घ्यावी लागेल. बरोबर की चूक, ते तुमच्यावर अवलंबून आहे. आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि आपल्याला मिळालेल्या सल्ल्याचे पालन करायचे. जर गोष्टी योग्य झाल्या, तर उत्तम आणि जर नसेल तर आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि पुढे जावे लागेल.’

त्यात पुढे लिहिले आहे की, ‘मला खूप सल्ला आणि पाठिंबा मिळाला, पण शेवटी मी ओळखले की आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी सर्वकाही माझ्यावर अवलंबून आहे.’ शिल्पाची ही पोस्ट राजच्या सुटकेनंतरची आहे आणि कुठेतरी हे पोस्ट तिच्या आयुष्यावरही अवलंबून आहे.

पहा शिल्पा शेट्टीची पोस्ट

Shilpa's Post

Shilpa’s Post

सध्या शिल्पा पूर्णपणे तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. तो शो जज करत आहे. यासोबतच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

शिल्पाचे चित्रपट

जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हंगामा 2’ या चित्रपटात शिल्पा शेवटची दिसली होती. शिल्पा या चित्रपटाबद्दल खूप उत्साहित होती, पण त्या काळात राज कुंद्राला अटक करण्यात आली, ज्यामुळे अभिनेत्री आधीच शॉकमध्ये होती. मात्र, शिल्पाने चाहत्यांना त्या काळात चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते.

‘निकम्मा’ चित्रपटात झळकणार अभिनेत्री

शिल्पा आता ‘निकम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, जो एक अॅक्शन रोमँटिक चित्रपट आहे. चित्रपटात शिल्पासोबत अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेतिया मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शबीर खान करत आहेत. कोविडमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. शर्ली या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

याशिवाय शिल्पाला आता आणखी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. तिला आता शक्य तितक्या लवकर आणखी प्रकल्पांवर स्वाक्षरी करायची आहे.

हेही वाचा :

Myra and Prarthana : ‘अपने पास बोहोत पैसा हैं’ म्हणत मायरा आणि प्रार्थना बेहेरेनं केलं क्यूट फोटोशूट, पाहा फोटो

Aai Kuthe Kay Karte | देशमुखांच्या घरात अखेर नवी सून प्रवेश करणार, अभिषेक-अनघा लवकरच लग्नबंधनात अडकणार!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI