अनेक सुपरहिट चित्रपट देणारा सलमान जेव्हा ‘अंतिम’मधील भूमिकेला घाबरला! जाणून घ्या नेमकं कारण काय..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (aayush sharma) यांचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात सलमानने पोलिसाची भूमिका साकारली आहे.

अनेक सुपरहिट चित्रपट देणारा सलमान जेव्हा ‘अंतिम’मधील भूमिकेला घाबरला! जाणून घ्या नेमकं कारण काय..
Salman Khan

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (aayush sharma) यांचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात सलमानने पोलिसाची भूमिका साकारली आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी आता सलमान खानने चाहत्यांना विश्वास बसणार नाही असे वक्तव्य केले आहे. वास्तविक, आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम व्यक्तिरेखा साकारणारा सलमान म्हणतो की, अंतिममधील भूमिका साकारताना तो खूप घाबरला होता.

ई-टाइम्सशी बोलताना सलमान म्हणाला की, अंतिममधील पोलिस अधिकाऱ्याची त्याची भूमिका त्याने आतापर्यंत साकारलेल्या पोलिसांच्या पात्रांपेक्षा वेगळी होती. ही व्यक्तिरेखा साकारताना तुम्हाला नर्व्हस वाटले होते का, असे जेव्हा सलमानला विचारण्यात आले, तेव्हा सलमान म्हणाला, ‘माझ्या पात्राचे काय करायचे हे मला माहीत होते. मला ती व्यक्तिरेखा जशी वर्णन केली गेली होती तशीच साकारायची होती. महेश मांजरेकर या व्यक्तिरेखेबाबतही असाच विचार करत होते. पण, शूट सुरू करताच मला भीती वाटली की, त्यांनी मला जे सांगितलं ते मी काहीच करत नाहीये.

…तर आयुषचं पात्र कमी पडलं असतं!

सलमान पुढे म्हणाला की, ‘पण नंतर मला वाटले की, आयुष त्याच्या पद्धतीने त्याचे पात्र साकारतो आहे, ज्याप्रमाणे मला वाटले होते की, मीही माझी भूमिका चांगली साकारली पाहिजे. मी जर त्यांच्यासारखंच माझं पात्र केलं असतं, तर त्याचं पात्र मरून गेलं असतं. आम्ही दोघंही आपापल्या भूमिका एकाच पद्धतीने करू शकलो नाही. आयुषने एका शक्तिशाली माणसाची भूमिका साकारली आहे, जो आतून खूप रागावलेला आहे. माझी व्यक्तिरेखा एका हसवणाऱ्या व्यक्तीची होती. पाणी फेकले तरी तो हसूनच ते फेकतो. त्यामुळे त्याला त्याची ताकद माहीत आहे. त्यामुळे मी माझे पात्र खूप विचार करून साकारले आहे. पण शूट करतान खूप मजा आली.

शीख पोलिसाची भूमिका बजावण्याची जबाबदारी

सलमान म्हणाला, ‘चित्रपटात मी एका शीख पोलिसाची भूमिका करत होतो, त्यामुळे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती. मी कोणताही समुदाय किंवा संस्कृती सादर करतो, तेव्हा त्यांचा नेहमीच आदर होईल याकडे मी व्यवस्थित लक्ष देतो. मी माझ्या सर्व चित्रपटांमध्ये हे लक्षात ठेवले आहे.’

सलमानने असेही सांगितले की, त्याने चित्रपटात घातलेला कडा त्याला अनेकदा त्रास देत होता. अभिनेत्याने सांगितले की, ‘शूटिंग करताना काही सीन करताना अनेकदा हाताला दुखापत झाल्यासारखे वाटत होते.’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही सलमान अंतिमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमानने सांगितले की, तो या चित्रपटाचे प्रमोशन गुजरात, दिल्ली आणि त्याच्या गावी इंदूरमध्ये करणार आहे.

हेही वाचा :

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding | धुमधडाक्यात सुरुये विकी-कतरिनाच्या लग्नाची तयारी, पाहुण्यांसाठी तब्बल 40 हॉटेल बुक!

Video | नको तिथेच बरोबर कट कसा?, नोरा फतेहीचा टॉप पाहून भडकले चाहते, पाहा व्हिडीओ…


Published On - 11:41 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI