AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा संजय दत्तने कारागृहात कैदी म्हणून केले काम, पिशव्या बनवून कमावले 440 रुपये!

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे (Sanjay Dutt) आयुष्य 'रोलर कोस्टर राईड'पेक्षा कमी नव्हते. संजय दत्तला 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात बेकायदेशीर शस्त्रे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते.

जेव्हा संजय दत्तने कारागृहात कैदी म्हणून केले काम, पिशव्या बनवून कमावले 440 रुपये!
Sanjay Dutt
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 6:49 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे (Sanjay Dutt) आयुष्य ‘रोलर कोस्टर राईड’पेक्षा कमी नव्हते. संजय दत्तला 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात बेकायदेशीर शस्त्रे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याने सुमारे पाच वर्षे तुरुंगात घालवली, परंतु चांगल्या वर्तनामुळे आठ महिन्यांपूर्वी त्याची सुटका झाली.

कारागृहाच्या नियमानुसार, प्रत्येक कैद्याला त्याच्या चांगल्या वर्तनासाठी प्रत्येक महिन्यात 7 दिवस माफ केले जाते. 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला अटक करण्यात आली होती. या दरम्यान, एजन्सींनी संजयची चौकशी केली होती. रेडिफ मेलमधील एका रिपोर्टनुसार, संजयने सांगितले होते, “डिसेंबर 1991 मध्ये, मी अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक फिरोज खान यांना यल्गारसाठी तारखा दिल्या होत्या. फिरोज खान शूटिंगसाठी संपूर्ण युनिट दुबईला घेऊन गेले. शूटिंग दरम्यानच फिरोज खानने माझी दाऊद इब्राहिमशी ओळख करून दिली.”

कशी झाली अंडरवर्ल्डशी ओळख?

संजयने असेही सांगितले होते की, “दुसऱ्या शूटिंग सत्रादरम्यान, फिरोजने माझी दाऊदचा भाऊ अनीसशी ओळख करून दिली. या भेटीनंतर, अनीस शूटिंगच्या ठिकाणी वारंवार येत असत. आमच्या लांबच्या बैठका असायच्या.” संजय म्हणाला की, “एक दिवस शूटिंग दरम्यानच दाऊदने आमच्या संपूर्ण युनिटला त्याच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. इतर युनिट सदस्यांप्रमाणे मीही त्या पार्टीला हजर होतो.”

संजयने त्या पार्टीबद्दल सांगितले होते, “पार्टीमध्ये बरेच लोक होते. आमची ओळख इक्बाल मिर्ची, शरद शेट्टी, छोटा राजन यांच्याशी झाली. पार्टीमध्ये अनेक पाकिस्तानी कलाकारही होते. अनीससोबत माझ्या सततच्या भेटींमुळे. त्याला चांगले ओळखण्यात मदत झाली.”

यल्गार बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी, संजय दत्तचा अंडरवर्ल्डशी असलेला संबंध आणखी घनिष्ट झाला. जर संजयचा अंडरवर्ल्डशी संपर्क नसता, तर कदाचित त्याला तुरुंगात जावे लागले नसते. संजयने आयुष्याची अनेक मौल्यवान वर्षे तुरुंगात घालवली गेली. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संजय दत्तची 256 दिवसांची शिक्षा म्हणजे आठ महिन्यांची शिक्षा कमी करण्यात आली, ज्याच्या आधारे त्याला आधीच सोडण्यात आले होते.

सामान्य कैद्याप्रमाणे वागणूक

मात्र, संजय दत्तने सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगात वेळ घालवला. संजय दत्त 440 रुपये घेऊन तुरुंगातून बाहेर आला जे त्याने तिथे काम करताना कमावले. संजय दत्तला शिक्षा सुनावताना कागदी पिशव्या बनवण्याचे काम देण्यात आले होते. तो तुरुंगातून बाहेर येईपर्यंत संजय दत्तने पंधराशे पिशव्या बनवल्या होत्या. संजय दत्तला दिवसाची मजुरी म्हणून फक्त 50 रुपये मिळत असत.

तुरुंगातही केला दानधर्म

सन 2016 मध्ये संजय जेव्हा शिक्षा पूर्ण करून तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याने अर्ध कुशल कामगार म्हणून 38 हजार रुपयांपर्यंत कमावले होते. मात्र, संजयने त्याच्या कमाईचा बराचसा भाग तुरुंगाच्या कँटीनमध्ये खर्च केला होता. सुटकेच्या दिवशी, जेल प्रशासनाकडे संजयचे वेतन म्हणून 440 रुपये थकीत होते.

काही अहवालांनुसार, संजयने तुरुंगाचे पैसे म्हणून सुटका केल्यानंतर उर्वरित पैसे पत्नी मान्यता दत्तच्या हातात ठेवले होते. तुरुंगात सकाळी पाच वाजता उठल्यानंतर संजय दत्तला दूध आणि केळे खाण्यासाठी दिले जायचे. त्यानंतर रात्री 8.30 वाजता नाश्ता दिला जायचा, ज्यात कधी पोहे होते तर कधी उपमा असायचा. संजय दत्तला त्याच्या स्वतःच्या बॅरेकमध्ये कागदी पिशव्या बनवण्याचे काम शिकवले गेले.

…आणि संजय दत्त धार्मिक झाला!

सुरुवातीला पिशव्या बनवण्यासाठी संजय दत्त खूप वेळ घेत असे, पण नंतर या कामात संजू बाबांचा हात साफ झाला. संजय दत्त तुरुंगात आजारी पडू लागला आणि त्याला घर आणि कुटुंबाची आठवण यायची. तुरुंगात असताना त्याला कुटुंबाची किंमत कळली. दरम्यान, अनेक आजारांनी संजय दत्तलाही आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली होती. सर्वात जास्त त्याला बीपीच्या समस्येला सामोरे जावे लागले. जेव्हा संजय दत्त धार्मिक पुस्तके वाचू लागला आणि त्याच्या खोलीत योगा करू लागला, तेव्हा त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली.

या 34 महिन्यांत संजय दत्तलाही अनेक वेळा पॅरोलवर सोडण्यात आले, ज्यावर त्याला अनेक गोंधळालाही सामोरे जावे लागले. संजय कधी पूजेकडे लक्ष देत नव्हता, पण पण तुरुंगात गेल्यानंतर तो धार्मिक बनला. तुरुंगातून संजयने रामायण, हनुमान चालीसा आणि गीता वाचण्यास सुरुवात केली. संजूने असेही म्हटले की, कारागृहामुळेच त्याला त्याच्या जीवनाचे खरे मूल्य कळले.

हेही वाचा :

Dussehra 2021 : उत्साह दसऱ्याचा; स्टार प्रवाहच्या कलाकारांनी सण-उत्सवानिमित्त व्यक्त केल्या भावना

Sumona Chakravarti : ‘कपिल शर्मा …’ मधील भुरी आहे प्रचंड हॉट, बिकिनीतील फोटोने सोशल मीडियावर लावली आग

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.