बॉलिवूडचे ‘तीन खान’ कोणत्याही मुद्द्यावर मौन का बाळगतात? नसीरुद्दीन शाह यांनी दिलं उत्तर

त्यांनी सांगितलं आहे की बॉलिवूडचे काही मोठे चित्रपट निर्माते आणि अभिनेते कसे प्रो-इस्टॅब्लिशमेंट्स चित्रपट बनवतात. (Why are Bollywood's 'Khans' stay's silent on any issue? Answer given by Naseeruddin Shah)

बॉलिवूडचे 'तीन खान' कोणत्याही मुद्द्यावर मौन का बाळगतात? नसीरुद्दीन शाह यांनी दिलं उत्तर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाहनं (Naseeruddin Shah) नुकतंच अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या राजवटीनंतर भारतीय मुस्लिमांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं, हे वाक्य प्रचंड व्हायरल झालं. आता त्यांनी सांगितलं आहे की बॉलिवूडचे काही मोठे चित्रपट निर्माते आणि अभिनेते कसे प्रो-इस्टॅब्लिशमेंट्स चित्रपट बनवतात. ते म्हणाले की जरी त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही की चित्रपट निर्माते आणि कलाकारांना प्रो-इस्टॅब्लिशमेंट्स चित्रपट बनवण्यासाठी क्लीन चिटचं आश्वासन दिलं जात आहे, परंतु त्यांना वाटतं की सध्या ज्या प्रकारे चित्रपट बनवले जात आहेत त्यावरुन हे स्पष्ट होतं.

नसीरुद्दीन यांनी हे सांगितलं, “सरकार समर्थक आणि प्रिय नेत्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करून त्यांना सरकारकडून चित्रपट बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. यासाठी त्यांना आर्थिक मदतही दिली जाते. यासह, जर त्यांनी असे चित्रपट बनवले त्यांना क्लीन चिटचं आश्वासनही दिलं जातंय. मोठे लोक मूलतत्त्ववादाचा अजेंडा लपवू शकत नाहीत.

तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते शहा यांनी हे देखील स्पष्ट केलं की मुस्लिम असल्यामुळे त्यांना या क्षेत्रात कधीही भेदभावाची वागणुक मिळाली नाही. मात्र, त्यांनी असंही नमूद केलं की इंडस्ट्रीतील कलाकारांना त्यांच्या मनातील गोष्टी बोलण्यासाठी त्रास दिला जातो. त्याच वेळी, प्रसिद्ध ‘तीन खान’नं गप्प राहण्याचा निर्णय का घेतला याबद्दल बोलताना नसीरुद्दीन म्हणाले की मी त्यांच्यासाठी बोलू शकत नाही, परंतु त्यांना किती त्रास होईल याची कल्पना मी करू शकतो. “ते (खान) त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकाराबद्दल चिंतित आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखं खूप काही आहे.

ज्येष्ठ अभिनेते पुढे म्हणाले की, हा केवळ आर्थिक छळ असणार नाही. तसंच, कोणत्याही प्रकारची मान्यता गमावण्याचाही हा छळ असू शकतो, मात्र त्यांच्या संपूर्ण आस्थापनांना त्रास देण्याची ही बाब असेल. ते  पुढे म्हणाले की, जो कोणी बोलण्याची हिंमत करतो त्याला त्रास दिला जातो. हे फक्त जावेद साहेब किंवा मी नाही, हे कोणीही असू शकतं जे या उजव्या विचारसरणीच्या विरोधात बोलतो त्याला त्रास होतोच..” नसीरुद्दीन शाह जवळजवळ पाच दशकांपासून भारतीय चित्रपट इंडस्ट्रीचा भाग आहेत आणि त्यांनी ‘निशांत’, ‘आक्रोश’, ‘मिर्च मसाला’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘जुनून’,’मंडी’,’अर्धसत्य’, ‘जाने भी दो’ सारखे काही उत्तम चित्रपट केले आहेत. त्यांच्या चित्रपटांसाठी त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या 

‘थलायवी’ नंतर आता कंगना रनौत साकारणार ‘सीता’, नव्या चित्रपटाची हटके घोषणा

ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा झळकणार मणिरत्नमच्या चित्रपटात, 400 ज्युनिअर आर्टिस्टसोबत शूट केले ‘पोन्नीयन सेल्वन’चे गाणे!

मुंबई विमानतळावर दीपिका पादुकोणचा क्लासी अंदाज कॅमेऱ्यात कैद, चाहत्यांना आली रणवीर सिंगची आठवण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI