ED चा बॉलिवूडकडे मोर्चा, नववधू अभिनेत्री यामी गौतमला समन्स, पुढील आठवड्यात झाडाझडती

Yami Gautam summons : अभिनेत्री यामी गौतमला (Yami Gautam ED) ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने फेमा कायद्या अंतर्गत हे समन्स बजावलं आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याने यामी गौतमला जबाब नोंदवावा लागणार आहे.

ED चा बॉलिवूडकडे मोर्चा, नववधू अभिनेत्री यामी गौतमला समन्स, पुढील आठवड्यात झाडाझडती
यामी गौतम
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 1:32 PM

मुंबई : महाराष्ट्रात अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या (ED) धडक कारवाया सुरु आहेत. अशा परिस्थितीत आता ईडीने आपला मोर्चा बॉलिवूडकडेही (Bollywood news) वळवल्याचं दिसतंय. अभिनेत्री यामी गौतमला (Yami Gautam ED) ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने फेमा कायद्या अंतर्गत हे समन्स बजावलं आहे. फेमा कायद्याचं (FEMA) उल्लंघन केल्याने यामी गौतमला जबाब नोंदवावा लागणार आहे. त्यासाठीच ईडीने पुढील आठवड्यात जबाब नोंदवण्यास हजर राहावं यासाठी समन्स बजावलं आहे. (Yami Gautam summoned by ED under FEMA act asking her to appear before them next week to record her statement)

ईडीने दुसऱ्यांदा यामी गौतमला समन्स बजावलं आहे. फेमा अर्थात परकीय चलनासंबंधित कायदा आहे. यानुसार, परदेशातून काही वस्तू-सेवांबाबत केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवली जाते. यामध्ये काही गडबड किंवा शंका आढळल्यास कारवाई केली जाते. फेमा कायद्यानुसार व्यवहार झालेली देशी किंवा परदेशी मालमत्ता जप्त करता येते.

यामी गौतमचं गुपचूप लग्न

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने गेल्या महिन्यात 4 जून रोजी गुपचूप लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली होती. यामी गौतमने आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्य धर (Aditya Dhar) यामी गौतम अभिनीत ‘उरी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर विक्की कौशलदेखील मुख्य भूमिकेत दिसला होता.

यामीची कारकीर्द

हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी यामी गौतम सध्या 32 वर्षांची आहे. तिचा जन्म 28 नोव्हेंबर 1988 रोजी झाला. यामी गौतमने ‘उरी’ सारख्या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. याशिवाय तिने तेलुगु आणि तामिळ सिनेमातही दमदार भूमिका साकारल्या आहेत.

यामी गौतम ‘फेअर अँड लव्हली’च्या जाहिरातीतून प्रकाशझोतात आली. त्यानंतर मग तिला 2008-09 मध्ये ‘चाँद के पार चलो’ ही टीव्ही मालिका मिळाली. त्यानंतर मग यामीने मागे वळून पाहिलं नाही. अनेक छोट्या मोठ्या सिरीयल करताना, तिला तेलुगु आणि तामिळ सिनेमांमध्ये भूमिका मिळाल्या.

यामीने 2012 मध्ये आलेल्या ‘विकी डोनर’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमातील अभिनयासाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाचा फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला.

ग्लॅमरसोबत लाईफ पार्टनर

यानंतर मग तिने 2015 मध्ये आलेल्या बदलापूर सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यानंतर मग तिची काबील सिनेमातील अंध महिलेची भूमिकाही गाजली. मात्र यामी गौतमला ग्लॅमर मिळवून दिलं ते म्हणजे 2019 मध्ये आलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राईक (Uri: The Surgical Strike) या सिनेमाने. याच सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक आदित्य धर आणि यामी गौतम एकमेकांना भेटले. त्यांची मैत्री वाढत गेली आणि यामीला ग्लॅमरसोबत आदित्यच्या निमित्ताने लाईफ पार्टरनही मिळाला.

संबंधित बातम्या 

Yami Gautam | अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाह बंधनात, ‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत घेतले ‘सातफेरे’! 

Yami Gautam : यामी गौतमनं शेअर केले लग्नातील अनसीन फोटो, चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

Non Stop LIVE Update
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.