AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yentamma Song | सलमान खान याचा लुंगीवर जलवा, ‘यनतम्मा’ गाण्याचा टीझर रिलीज, चाहत्यामध्ये उत्साह

सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. याच चित्रपट शहनाज गिल देखील देखील दिसणार आहे.

Yentamma Song | सलमान खान याचा लुंगीवर जलवा, ‘यनतम्मा’ गाण्याचा टीझर रिलीज, चाहत्यामध्ये उत्साह
| Updated on: Apr 03, 2023 | 8:05 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रेक्षकांचा जबरदस्त आवडलाय. इतकेच नाहीतर या चित्रपटातील अनेक गाणेही रिलीज झाले आहेत. एप्रिलमध्ये सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट (Movie) रिलीज होणार आहे. नुकताच सलमान खान याच्या चित्रपटातील नवीन गाण्याचा टीझर रिलीज झालाय.

नुकताच किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील यनतम्मा या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या गाण्यावर सलमान खान याचा जबरदस्त लूक दिसतोय. सलमान खान याच्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. सलमान खान या गाण्यामध्ये लुंगी लूकमध्ये दिसत आहे. सलमान खान याच्या या गाण्याचा टिझर पाहून चाहत्यांमधील उत्साह अजून वाढलाय.

सलमान खान याचा बहुचर्चित किसी का भाई किसी की जान हा चित्रपट एप्रिल 2023 मध्ये ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात सलमान खान काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सलमान खान याचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विशेष म्हणजे सलमान खान याच्या या चित्रपटामध्ये बिग बाॅस फेम शहनाज गिल ही देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. शहनाज गिली हिच्यासोबतच श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

गाण्याच्या शेवटच्या टीझरमध्ये सलमान खान आणि व्यंकटेश यांच्यासोबत डान्स फ्लोअरवर एक मिस्ट्री मॅन दिसत आहे. आता असा अंदाजा चाहते लावताना दिसत आहे की, हा दुसरा तिसरा कोणी नसून राम चरण हा आहे. गाण्याचा टिझर पाहून चाहत्यांमधील उत्साह अजूनच वाढल्याचे दिसत आहे.

किसी का भाई किसी की जान चित्रपटामधील पहिले गाणे नय्यो लगदा हे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. विशेष म्हणजे या गाण्याला चाहत्यांनी खूप जास्त प्रेमही दिले. त्यानंतर चित्रपटातील बिल्ली बिल्ली हे गाणे दोन मार्चला रिलीज झाले. काही दिवसांपूर्वी शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची झलक बघायला मिळाली होती. या चित्रपटात पठाण ज्यावेळी अडचणीमध्ये असतो, त्यावेळी सलमान खान हा त्याला वाचवण्यास येतो असे दाखवण्यात आले आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच