Border 2: पाकिस्तानचं ऑपरेशन चंगेज खान काय होतं? इंडियन एअर फोर्सने त्यांना कशी धूळ चारलेली?
Border 2: 'बॉर्डर 2' सिनेमामुळे ऑपरेशन चंगेज खान पुन्हा चर्चेत आलं आहे. 1971 साली झालेल्या युद्धात पाकिस्तानने भारताविरोधात मोठा कट रचलेला होता... पण इंडियन एअर फोर्सने त्यांना कशी धूळ चारलेली घ्या जाणून...

Border 2: 1971 साली झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धाला तिसरं युद्ध देखील म्हटलं जातं. बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान पूर्व पाकिस्तानमध्ये हे घडले. या संघर्षामुळे बांगलादेशची निर्मिती झाली आणि हा भारताच्या सर्वात निर्णायक लष्करी विजयांपैकी एक ठरला… ‘बॉर्डर 2’ हा सिनेमा युद्धाच्या महत्त्वाच्या भागावर आधारलेला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानच्या पहिल्या हल्ल्यानंतर पश्चिम क्षेत्रात झालेल्या हवाई आणि जमिनीवरील लढायांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
ऑपरेशन चंगेज खान
3 डिसेंबर 1971रोजी संध्याकाळी भारतीय हवाई दलाच्या (IAF) अग्रेषित हवाई तळांवर आणि रडार प्रतिष्ठानांवर पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या हल्ल्यांना ऑपरेशन चेंगेज खान हे कोड नेम देण्यात आलं होतं. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या औपचारिक सुरुवातीचे चिन्ह होते. पाकिस्तानने अमृतसर, अंबाला, आग्रा, अवंतीपूर, बिकानेर, हलवारा, जोधपूर, जैसलमेर, पठाणकोट, भुज, श्रीनगर आणि उत्तरलाई यासह ११ भारतीय हवाई तळांवर तसेच अमृतसर आणि फरीदकोट येथील हवाई संरक्षण रडार स्टेशनवर हल्ला केलेला.
भारताने पाकिस्तानला धूळ चारलेली
पाकिस्तानने राबवलेल्या ऑपरेशनचा हेतू भारताला मोठ्या प्रमाणत नुकसान पोहोचवणं होतं. पण पाकिस्कानच्या सर्व योजना फेल ठरल्या. अनेक रिपोर्टनुसार, या हल्ल्यांमुळे भारताचं मर्यादित नुकसान झालं, अमृतसरमधील धावपट्टीवर खड्डे पडले आणि रडार स्टेशनचं नुकसान झालं. एवढंच नाही तर, या ऑपरेशनरम्यान पाकिस्तानने चार विमाने गमावली.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या हल्ल्यांना युद्धाची औपचारिक घोषणा मानलं, त्यानंतर भारतीय सैन्याने लगेचच प्रत्युत्तर दिलं. त्या रात्री भारतीय हवाई दलाने प्रतिहल्ला केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या प्रमाणात हवाई ऑपरेशन करण्यात आले.
सांगायचं झालं तर, सनी देओल स्टारर बॉर्डरमधील शीख रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल फतेह सिंग क्लेर यांची भूमिका साकारत आहेत. त्याची भूमिका 1971 च्या युद्धादरम्यान युद्धभूमीवर नेतृत्व आणि शौर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेजर जनरल हरदेव सिंग क्लेर यांच्यापासून प्रेरित आहे.
बॉर्डर 2 सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘बॉर्डर 2’ हा सिनेमा अवघ्या तीन दिवसांत सनी देओलच्या करिअरमधील दुसरा सर्वांत मोठा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाने ‘जाट’ (90.34 कोटी रुपये) आणि ‘गदर: एक प्रेम कथा’ (76.88 कोटी रुपये) यांच्याही कलेक्शनला मागे टाकलं आहे. जगभरात ‘बॉर्डर 2’ने 239.4 कोटी रुपये कमावले आहेत.
