Adipurush: ‘बॉयकॉट गँग’ आदिपुरुषच्या टीझरवर तुटूनच पडली; धडाधड दिली बहिष्काराची कारणं

ओम राऊतच्या 'आदिपुरुष'चा टीझर येताच बॉयकॉटचा ट्रेंड सुरू

Adipurush: 'बॉयकॉट गँग' आदिपुरुषच्या टीझरवर तुटूनच पडली; धडाधड दिली बहिष्काराची कारणं
ओम राऊतच्या 'आदिपुरुष'चा टीझर येताच बॉयकॉटचा ट्रेंड सुरूImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 5:08 PM

मुंबई- ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या बिग बजेट चित्रपटाचा टीझर अयोध्येत संपूर्ण टीमकडून लाँच करण्यात आला. सोशल मीडियावर जेव्हा हा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यावरून विविध प्रतिक्रियांचा वर्षाव होऊ लागला. रामायणाच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या टीझरमधील अनेक मुद्द्यांवरून नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे. आधीच ट्विटरवर बॉलिवूड चित्रपटांविरोधात ‘बॉयकॉट’चा ट्रेंड (Boycott Trend) सुरू होता. आता आदिपुरुषचा टीझर येताच बॉयकॉटची संपूर्ण गँगच तुटून पडली आहे. सोमवारपासून ट्विटरवर ‘बॉयकॉट आदिपुरुष’चा ट्रेंड जोरदार सुरू झाला. यावेळी नेटकऱ्यांनी एक किंवा दोन नाही तर बॉयकॉटच्या कारणांची यादीच मांडली आहे.

या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. यातील रावणाच्या भूमिकेवरून नेटकऱ्यांनी दिग्दर्शक ओम राऊतला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘रावण आहे की अल्लाउद्दीन खिल्जी’ अशा शब्दांत लूकवरून टीका होऊ लागली.

हे सुद्धा वाचा

चित्रपटातील VFX वरूनही प्रेक्षकांची निराशा झाली. गेम ऑफ थ्रोन्स, ॲक्वामॅन, राइज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमधून काही सीन्स कॉपी केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला.

लंकेश रावणच नाही तर हनुमानाचं चित्रणही चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली आहे. दाढी आणि केसांच्या स्टाइलमुळे ते मुघल शासकांसारखे दिसत असल्याचा टोला काही युजर्सनी लगावला आहे. जवळपास पावणे दोन मिनिटांच्या या टीझरमधल्या अनेक गोष्टी नेटकऱ्यांना खटकल्या.

आदिपुरुषमध्ये सनी सिंह हा लक्ष्मणाची भूमिका साकारतोय. 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच नेटकऱ्यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.