AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milind Soman | मिलिंद सोमण यांच्या अडचणीत वाढ; न्यूड फोटोशूटप्रकरणी गोव्यात गुन्हा दाखल

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्यामुळे अभिनेता मिलिंद सोमण यांच्या (Milind Soman) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या फोटोशूटमुळे त्यांच्याविरोधात गोव्यातील वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

Milind Soman | मिलिंद सोमण यांच्या अडचणीत वाढ; न्यूड फोटोशूटप्रकरणी गोव्यात गुन्हा दाखल
| Edited By: | Updated on: Nov 07, 2020 | 6:10 AM
Share

पणजी : गोव्याच्या बीचवर अश्लील व्हिडीओ चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेला अटक झाल्याची घटना ताजी असतानाच गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमण अडचणीत आले आहेत. टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार या फोटोशूटमुळे त्यांच्याविरोधात गोव्यातील वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. मिलिंद सोमण यांनी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड होऊन पळतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. सोमण यांच्या याच फोटोशूटवर गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवत त्यांच्याविरोधात तक्रार नोंंदवली आहे. (case has been registered against Milind Soman for nude photoshoot in Goa)

मिलिंद सोमण 4 नोव्हेंबरला आपल्या पत्नीसोबत गोव्यात गेले होते. त्यावेळी मिलिंद यांनी समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केला. तसेच स्वत:चा न्यूड फोटो आपल्या इन्टाग्राम अकाऊंटर पोस्ट करत फोटोला ‘हॅपी बर्थडे टू मी’ असं कॅप्शन दिलं. त्यानंतर मिलींद यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

मिलींद यांच्या या फोटोवर गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवला आहे. या पक्षाने मिलिंद सोमण यांच्याविरोधात वास्को पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी गोवा सुरक्षा मंचने ‘सोमण यांनी न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान होत असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्यामुळे सोमण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी अभिनेत्री पूनम पांडे विरोधातही गोव्याच्या समुद्र किनारी आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रण केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. पूनम पांडे (Poonam Pandey) आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे (Sam Bomabay) यांना कॅनकोना येथून गुरुवारी ( 5 नोव्हेंबर) अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

Poonam Pandey | गोव्याच्या किनारी आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीकरण, अटकेनंतर पूनम पांडेला जामीन!

तू खरंच 55 वर्षांचा आहेस? मिलिंद सोमणच्या फिटनेसने पंतप्रधान मोदीही अवाक

किलीमंजारो पर्वतावर सेलिब्रेशन, पत्नीला मिलिंद सोमणचं लिप लॉक विश

(case has been registered against Milind Soman for nude photoshoot in Goa)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.