AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Casting Couch: ‘…हे करत नसाल तर तुमचे करियर उद्ध्वस्त’ असं का म्हणते अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठी म्हणजे टीव्ही जगातातील एक गाजलेलं आणि प्रसिद्धीच्या झोताच्या उंचीवर पोहचलेलं नाव. पण दिव्यांका त्रिपाठी हे नाव टीव्ही, सिनेमा क्षेत्रात दिसत असलं तरी तिच्या करियरच्या सुरूवातीचे दिवस खडतर होते. हे आता कुणी सांगितले तर ते आता खरंही वाटणार नाही पण तेच वास्तव आहे. एक काळा होता जो दिव्यांका त्रिपाठीच्या पाचवीला फक्त संघर्षच पूजलेला होता.

Casting Couch: '...हे करत नसाल तर तुमचे करियर उद्ध्वस्त' असं का म्हणते अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी
Divyanka Tripathi
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 4:53 PM
Share

मुंबईः ये है मोहब्बते (Yeh Hai Mohabbatein) या मालिकेमुळे टीव्ही जगातातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) ही प्रेषकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्याआधीही तिने काही कार्यक्रमांतून आपल्या कामातून आपल्या नावाचे वलय निर्माण केले होते. दिव्यांका त्रिपाठीच्या करियरची (career) सुरुवात तिने मोठ्या संघर्षातून केली आहे. आज जे तिला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झाले आहे तिच्या संघर्षातून तिला मिळाले आहे. सध्या तिने दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे, तो म्हणजे तिलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. बॉलबूड बबलच्या मुलाखतीत तिने आपल्या करियरच्या सुरुवातीचे दिवस कसे होते हे सांगताना ती भावूक होऊन सांगते की, कधी काळी वीज बिल आणि घरात बाझार आणायलाही पैसे नव्हते. त्याकाळात कामाचा ताण होता आणि त्याचवेळी पैश्याची कमतरताही होती. त्या परिस्थितीचा काही जण फायदा उठवण्याचा प्रयत्न करत होते.

दिव्यांका त्रिपाठी हिचा प्रवास सोपा नव्हता पण तिने आपल्या तत्वाशी एकरुप राहून तिने टीव्ही जगातातील प्रवास सुरु ठेवला आहे. काही लोक काम देण्याच्या अगोदर म्हणायचे की, काम पाहिजे तर या या गोष्टी तुला कराव्या लागतील त्यावेळी या गोष्टीमुळे मला खूप मनस्तापही होत होता असेही ती सांगते.

Me too ची सुरुवात होण्याआधी धमकी

दिव्यांका तिच्या कास्टींग काऊचची आठवण सांगते तेव्हा Me too ही सोशल मीडियावर सुरू नव्हते. त्याकाळी माझे करियर संपवण्याची धमकीही काही माणसांनी मला दिली आहे.

काम मिळणार नाही हेच सांगितलं जातं

चंदेरी दुनियेबाबत ती सांगताना म्हणते की, अशी कामं करणारी माणसेच अशा ऑफर देतात. तिच माणसं अशा कामासाठी विनवण्या करतात. आणि हे पण सांगतात की, इंडस्ट्रीमध्ये कामासाठी जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला अशीच माणसं भेटणार, असे केले नाही तर तुम्हाला काम मिळणार नाही असंही तुमच्या मनावर ती बिंबवतात.

करियर उद्ववस्त करण्याच्या तयारीला

तुम्हाला ऑफर घेऊन येणाऱ्या माणसांचं तुम्ही ऐकला नाही की, ती माणसं तुमचं करियर उद्ववस्त करण्याच्या तयारीला लागतात. तरीही अशा माणसांचा सामना करत ती आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करत होती, आणि अशा माणसांबरोबर ती हसत हसत सामनाही करायची.

आणि दिव्यांका प्रेमात पडली

टीव्ही जगतातील दिव्यांका त्रिपाठीने आपल्या कारकीर्दीत तिने चांगल्या प्रोजेक्टसवर काम केले आहे.एकता कपूरचे शो तिला आवडतात, त्याबाबत तिच्याकडे अशा ऑफरही आल्या होत्या मात्र तिच्या ये है मोहब्बतें शोमध्ये ती व्यस्त होती. या कार्यक्रमामधीलच एका कलाकारासोबत तिची मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर नंतर प्रेमात होऊन काही दिवसांनी ते दोघेही विवाहबंधनात बांधले गेले.

संबंधित बातम्या

लतादिदींच्या तब्बेतीत सुधारणा, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण बातमी

Bigg Boss 15 Grand Finale : आज बिग बॉसची फायनल, प्रतीक सहजपाल जिंकण्याची शक्यता; नेटक-यांमध्ये चर्चा

‘मला तुमची मदत हवी आहे’, बहिणीसाठी शिल्पा शेट्टींची चाहत्यांना कळकळीची विनंती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.