Bigg Boss 15 Grand Finale : आज बिग बॉसची फायनल, प्रतीक सहजपाल जिंकण्याची शक्यता; नेटक-यांमध्ये चर्चा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Jan 30, 2022 | 3:12 PM

बिग बॉसमधल्या काही गेम प्रतिकने चांगल्या खेळल्या असल्यामुळे तो अंतिम पाचमध्ये आल्याचे आपण पाहिले आहे.

Bigg Boss 15 Grand Finale : आज बिग बॉसची फायनल, प्रतीक सहजपाल जिंकण्याची शक्यता; नेटक-यांमध्ये चर्चा
प्रतिक सहजपाल

मुंबई – बॉसच्या 15 व्या सिझनचा आज ग्रॅण्ड फिनाले (Big Boss 15 Grand Finale) आहे. त्यामुळे आज कोणता स्पर्धेत चमकता चषक (trophy) जिंकेल याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बिगबॉसची स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वच स्पर्धेत उत्सुक असल्याचे आपण आत्तापर्यंत झालेल्या खेळातून आणि टास्कमधून पाहिले. आज होणा-या ग्रँड फिनालेमध्ये (grand finale)कोणता स्पर्धेक बाजी मारतोय ? हे काही तासातचं सगळ्यांना समजेल असं वाटतंय. प्रतिक सहजपाल (pratik sahjpal) सुध्दा मुख्य दावेदार असल्याचं त्यांच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. कारण तशी चर्चा नेटक-यांमध्ये पाहायला मिळत आहे. बॉसच्या 15 व्या सिझनचा तो एक चांगला खेळाडू मानला जातोय. आत्तापर्यंत घेतलेल्या सर्व खेळामध्ये त्याने आपलं दमदार प्रदर्शन दाखवलं होतं. तसेच हा सिजन जिंकण्यासाठी त्याच्याकडे चांगले पॉईंट सुध्दा आहेत.

प्रतीक सहजपाल दावेदारी यामुळे प्रबळ

बॉसच्या 15 व्या सिझन आता पुर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे, तसेच सगळ्यांचे डोळे आज विजेता कोण ठरणार त्यावर टिकून राहिलेली आहेत. सद्या 5 स्पर्धेत या अंतिम खेळात आपली बाजू मजबूत करून उभे आहेत. काल त्याच्यातून रश्मी देसाई खेळातून बाहेर पडल्या, त्यामुळे प्रतीक सहजपाल यांची दावेदारी नेटक-यांमध्ये मजबूत असल्याची पाहायला मिळत आहे. तशी चर्चा सुध्दा तुम्हाला प्रतीक सहजपाल चाहत्यांकडून नेटवरती पाहायला मिळेल. प्रतीक सहजपाल ज्यावेळी बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये पोहोचला त्यावेळी पवित्रा पुनिया एक्स बॉयफ्रेंड म्हणून त्याची ओळख होती. परंतु त्याने खेळातून आपली वेगळी ओळख आणि चाहते निर्माण केल्याचे पाहावयास मिळाले. त्याची या शोमध्ये एक रागीट चेहरा म्हणून ओळख होती. शो दरम्यान झालेल्या चुकांमुळे अनेकदा सलमान खानचा अनेकदा प्रतीक सहजपाल याने ओरडा खाल्याचे सुध्दा पाहावयास मिळाला आहे.

काही सेलिब्रिटींचा प्रतीकला सपोर्ट

बिग बॉसमधल्या काही गेम प्रतिकने चांगल्या खेळल्या असल्यामुळे तो अंतिम पाचमध्ये आल्याचे आपण पाहिले आहे. तसेच त्याचं सोबत असलेल्या स्पर्धेकांसोबत सुध्दा चांगले संबंध असल्याचे पाहावयास मिळाले होते. काही सेलिब्रिटींनी प्रतिकला सपोर्ट दर्शविला आहे. त्यामुळे प्रतिकचा चाहता वर्ग सुध्दा चांगला वाढला आहे. त्यांच्या चाहत्यांना तो जिंकावा असं वाटतं असल्यामुळे त्याला चांगल्या पध्दतीने स्पोर्ट करत असल्याचे पाहावयास मिळतं आहे.

‘मला तुमची मदत हवी आहे’, बहिणीसाठी शिल्पा शेट्टींची चाहत्यांना कळकळीची विनंती

वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ बबीताच्या अंगलट, केव्हाही अटक होण्याची शक्यता

राखी सावंतचं विनर रुबिकाला ओपन चॅलेंज, सलमान म्हणाला, जास्त कॉन्फिडन्स दाखवू नको, पुढे मंचावर १ मिनिट धिंगाणा!


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI