बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री एकमेकींचं तोंडही पाहत नाहीत; बॉयफ्रेंडमुळे वाद टोकाला
Bollywood Actress | बॉयफ्रेंडमुळे बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यामध्ये छत्तीसचा आकडा... एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत... सोशल मीडियावर देखील अभिनेत्रींचे वाद पोहोचले टोकाला... सोशल मीडियाच्या माध्यमातून साधला निशाणा... सध्या सर्वत्र बॉलिवूड अभिनेत्रींची चर्चा...

मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं. अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक सिनेमे साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अभिनयापासून दूर आहेत. पण अनेक कारणांमुळे अभिनेत्री चर्चेत असतात. बॉलिवूडच्या काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत. आज अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेवू ज्या एकमेकींच्या शत्रू आहे. या यादीमध्ये अशा अभिनेत्रींची नावे आहेत, ज्यावर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही.
दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ | अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री कतरिना कैफ आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहेत. अभिनेता रणबीर कपूर याच्यामुळे दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये भांडण आहे. दोघी देखील आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत.
आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर | अभिनेत्री आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर आज प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. पण एका काळ असा होता जेव्हा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यामुळे अभिनेत्रींमध्ये वाद झाले. पण आता आलिया आणि सिद्धार्थ त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये आनंदी आहेत. तर श्रद्धा तिचं खासगी आयुष्य कायम गुपित ठेलते. एकेकाळी अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत देखील श्रद्धा रिलेशनशिपमध्ये होती.
करीना कपूर आणि ऐश्वर्या राय | करीना कपूर खान कायम तिच्या बोल्ड अदा आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. कलाविश्वात ऐश्वर्या आणि करीनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण दोघी प्रसिद्ध अभिनेत्रींमधील नातं काही ठिक नाही. दोघी एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत.
कंगना रनौत – आलिया भट्ट | अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यामध्ये देखील वाद आहे. दोन्ही अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकींवर निशाणा साधला आहे. दोघींची भांडणं देखील अनेकदा चाहत्यांच्या समोर आली. दोघीचं एकमेकींसोबत पटत नाही, हे देखील दोघींच्या चाहत्यांना माहिती आहे.
ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी | ९० च्या दशकातील अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आजही त्यांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. पण दोन प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेता शाहरुख खान याच्यामुळे भांडणं आहेत. सिनेमात ऐश्वर्या राय हिच्या जागी राणी मुखर्जी हिला घेतल्यामुळे दोघींमधील वाद टोकाला पोहोचले.
