2024 मध्ये या सेलिब्रिटींनी घेतला घटस्फोट; पाच नंबरचं कपल अत्यंत महत्त्वाचं!

2024 हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट जगतासाठी घटस्फोटांनी गाजलं. ए.आर. रहमान, धनुष, सानिया मिर्झा, आणि अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यातील हे धक्कादायक निर्णय त्यांच्या चाहत्यांना चकित करणारे ठरले. या लेखात आपण या सर्व घटस्फोटांची कारणे आणि त्यांच्यावर झालेल्या प्रतिक्रियांचा आढावा घेणार आहोत.

2024 मध्ये या सेलिब्रिटींनी घेतला घटस्फोट; पाच नंबरचं कपल अत्यंत महत्त्वाचं!
AR Rahman, Saira Banu, Shoaib Malik and Sania MirzaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 3:04 PM

भारतीय चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट जगतात यंदा बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्यातल्या काही सेलिब्रिटींच्या घटस्फोटांच्या बातम्याही चर्चेचा विषय बनल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनी या वर्षी विवाह केला, तर काहींनी घटस्फोट घेतल्याची घोषणा केली आहे. काही घटस्फोट वाचकांसाठी धक्का देणारे होते. तर काही घटस्फोट अनपेक्षित होते. त्यामुळे यंदाचं वर्ष सिनेमा आणि क्रीडा क्षेत्रासाठी थोडसं नरम गरमच राहिलं आहे.

ए.आर. रहमान आणि सायरा बानू

ए.आर. रहमान आणि सायरा बानू यांनीही अलिकडेच घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. या दांपत्याला तीन मुले आहेत. त्यांचा विवाह 1995 मध्ये झाला होता. पण त्यांनी एकाएकी वेगळे होण्याची घोषणा केली. त्यांच्या वकील वंदना शा यांनी या दांपत्याचा घटस्फोट संबंधित प्रक्रिया समजावून सांगितली आहे.

चंदन शेट्टी आणि निवेदिता गौडा

कन्नड सिनेमातील प्रसिद्ध जोडी निवेदिता गौडा आणि चंदन शेट्टी यांनी घटस्फोट घेण्याची घोषणा केली. बिग बॉसच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह केला. पण आता त्यांच्या नात्यात कटुता आली आहे.

हे सुद्धा वाचा

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत

तमिळ सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी घटस्फोट घेतला आहे. 2004 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. 20 वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

दलजीत आणि निखिल पटेल

हिंदी टेलिव्हिजन स्टार दलजीत कौर आणि निखिल पटेल यांनी 2024 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करून आपलीच बाजू कशी योग्य आहे हे ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये विवाह केला होता. हैदराबादमध्ये झालेल्या या विवाहानंतर सानियाने शोएबपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तर शोएबने पाकिस्तानी मॉडेलशी विवाह केला आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा

हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी जानेवारीमध्ये एंगेजमेंट केली होती. या निमित्ताने त्यांनी जंगी पार्टी दिली होती. विवाहानंतर त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा झाला. पण त्यांचा संसार अधिक काळ टिकू शकला नाही.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा विवाह झालेला नाही. मात्र, ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. बऱ्याच वर्षाच्या लिव्ह इन रिलेशनशीपनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा दोघांनीही केली नाही

ईशा देओल

ईशा देओलने उद्योजक भारत ताखर यांच्याशी विवाह केला होता. मात्र, आता त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ.
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ.
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री.
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला.
मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन.
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....